Shivsena Politics: 3 दिवस, 3 जिल्हे, 23 विधानसभा मतदारसंघ..! खासदार श्रीकांत शिंदेंचा झंझावाती शिवसंवाद दौरा, मराठवाडा पिंजून काढणार

Shivsena News : राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. जागा वाटपावरून महायुतीमध्ये तानातानी सुरू आहे. अशावेळी शिंदे यांचा हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Eknath Shinde, Shrikant Shinde
Eknath Shinde, Shrikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : राज्यातील महायुतीत असलेल्या शिवसेनेने मिशन 2029 लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यासह राज्यातील संघटनात्मक बांधणीची मोठी जबाबदारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर शिंदे यांचा दुसरा मराठवाडा दौरा पुढील तीन दिवसात होत आहे.

श्रीकांत शिंदे हे 27 ते 29 मे दरम्यान मराठवाड्यात तीन दिवस ठाण मांडून बसणार आहेत. तीन जिल्हे, तेवीस विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि शिवसंवादच्या माध्यमातून ते मराठवाडा पिंजून काढणार आहेत. शिंदे यांच्या मागील मराठवाडा दौऱ्यात पक्षांतर्गत गटबाजी, नेत्यांचा घरातच पदांचा हव्यास आणि त्यातून पक्षाचे झालेले नुकसान याचे चित्र समोर आले होते.

नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेषतः पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नेत्यांबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांचा तीन दिवसांचा हा मराठवाडा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. जागा वाटपावरून महायुतीमध्ये तानातानी सुरू आहे. अशावेळी शिंदे यांचा हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

बैठकीसाठी आजी-माजी खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, माजी सरपंच यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 27 मे रोजी जालना जिल्ह्यापासून या शिवसंवाद दौऱ्याला सुरूवात होणार आहे. जालना, भोकरदन, घनसावंगी परतूर विधानसभानिहाय आढावा यावेळी घेण्यात येणार आहे.

Eknath Shinde, Shrikant Shinde
Chhagan Bhujbal News: राज्यात पेट्रोल अन् डिझेलची टंचाई? मंत्री भुजबळांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक आकडेवारीसह खरं काय ते सांगितलं

दुसर्‍या दिवशी म्हणजे 28 रोजी नांदेड जिल्ह्यातील नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर आणि लोहा तसेच नायगाव, मुखेड, देगलूर, किनवट, हदगाव-भोकर विधानसभा मतदारसंघाचा एकत्रित आढावा श्रीकांत शिंदे घेणार आहेत. तर 29 रोजी बीड जिल्ह्यातील परळी, केज, बीड, माजलगांव, आष्टी आणि गेवराई या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.

या दौऱ्यात मंत्री भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, प्रकाश जयस्वाल, खासदार संदीपान भुमरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी खासदार आनंद परांजपे हे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत असणार आहेत. या बैठकांमध्ये संघटन अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन, आगामी निवडणुकांची रणनीती, स्थानिक प्रश्न, जनसंपर्क वाढविणे, मतदारयाद्या पुनरिक्षण (एसआयआर) तसेच पक्ष संघटन विस्तार यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com