

Nanded police station incident : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या प्रकरणात ताब्यात असलेल्या एका युवकाने नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली.
यामध्ये ओंकार शहाणे (वय 21) हा जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस ठाण्यात अटकेची प्रक्रिया सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे काही काळ पोलिसांची धावपळ उडाली.
पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, कार्तिक झोटे (वय 19) आणि ओंकार शहाणे (वय 21, दोघे रा. जावळा झोटा, ता. पाथरी, जि. परभणी) या दोघांविरुद्ध दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याप्रकरणी नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दोन्ही मुली शिक्षणासाठी नांदेड येथे आल्या होत्या. त्या शहरातील एका वसतिगृहात वास्तव्यास होत्या. दरम्यान, या मुली संबंधित दोन्ही युवकांसोबत (Youth) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना घेऊन हे तरुण हैदराबादमार्गे पुण्याकडे जात असल्याचेही तपासात समोर आले.
याप्रकरणी सोलापूर रेल्वे पोलिसांनी शनिवारी रात्री दोन्ही युवकांना ताब्यात घेतले. त्याबाबत भाग्यनगर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक सोलापूरकडे रवाना झाले. पहाटे चारच्या सुमारास दोन्ही तरुणांसह मुलींना ताब्यात घेऊन त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास भाग्यनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर दोघांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
याचदरम्यान कार्तिक झोटेवरील प्रक्रिया सुरू असताना ओंकार शहाणे अचानक खोलीबाहेर आला आणि त्याने पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून खाली उडी घेतली. या घटनेत तो जखमी झाला. पोलिसांनी तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान, या घटनेत दुसऱ्या तरुणानेही उडी मारल्याची चर्चा होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या युवकानेच उडी घेतली असून, दुसऱ्या युवकाने उडी मारलेली नाही. दोन अल्पवयीन मुलींशी संबंधित या प्रकरणात पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.