Nanded Congress News : भाजपच्या चिखलीकरांविरोधात नांदेडमध्ये काँग्रेसकडून चव्हाणच...

Loksabha Election 2024 : अशोक चव्हाण यांच्यासोबतच अनेक वर्षे राजकीय डावपेच शिकलेले वसंत चव्हाण आता त्यांना आव्हान देणार आहेत.
Vasantrao Chavan, Prataprao Chikhlikar
Vasantrao Chavan, Prataprao ChikhlikarSarkarnama

Nanded Political News : गेल्या 40 वर्षांपासून नांदेड जिल्ह्यावर एक हाती वर्चस्व राखलेल्या अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर लोकसभेसाठी काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

अखेर काँग्रेसने (Congress) नांदेडमधून चव्हाण यांनाच उमेदवारी दिली आहे. वसंत चव्हाण यांच्या उमेदवारीवर अपेक्षेप्रमाणे आज शिक्कामोर्तब झाले. अशोक चव्हाण यांच्यासोबतच अनेक वर्षे राजकीय डावपेच शिकलेले वसंत चव्हाण आता त्यांना आव्हान देणार आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागावाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेसने मराठवाड्यातील लातूर व नांदेडचे उमेदवार घोषित केले आहेत. नांदेडचा काँग्रेसचा अवघड किल्ला लढविण्याची जबाबदारी माजी आमदार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यांच्या नावाची एकमेव शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित मानले जात होते.

Vasantrao Chavan, Prataprao Chikhlikar
Shivaji Kalge News : देशमुख काका-पुतण्याचा सिग्नल अन् काळगेंना लोकसभेचं तिकीट!

महाविकास आघाडीच्या जागावाटपात नांदेडची जागा काँग्रेसला सुटणार हे निश्चित होते. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) यांच्या नावाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. तसेच नायगाव, देगलूर-बिलोली या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क व दबदबा आहे.

भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण गेल्यावर वसंत चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण गेल्याने काँग्रेसची (Congress) परिस्थिती अवघड झाली आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीत वसंतराव चव्हाण यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याशी दोन हात करून नांदेडची जागा खेचून आणावी लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेडच्या मतदारांनी काँग्रेसला कठीण परिस्थितीत तारले आहे. काँग्रेसची पारंपरिक मतं आजही कायम आहेत. याशिवाय शिवसेनेसोबत आहे. जर वंचित बहुजन आघाडी सोबत राहिली तर काॅंग्रेस नांदेडला चमत्कार करू शकते.

परंतु, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वारंवार बदलली भूमिका आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वंचित सोबतची बोलणी फिसकटल्याचे दिलेले संकेत पाहता नांदेडमध्ये काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या मदतीनेच लढा द्यावा लागणार आहे.

(Ediited By Deepak Kulkarni)

R

Vasantrao Chavan, Prataprao Chikhlikar
Pune Loksabha Election : मोहोळांचा प्रचाराचा धडाका तर नाराज मुळीकांनी घेतली फडणवीसांची भेट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com