Sanjay Rathod : शेतकऱ्यांची थट्टा करता, भिकाऱ्यासारखं वागवता; संतप्त शेतकरी थेट शिंदेंच्या मंत्र्यांला भिडले

Nanded farmers protest News : बुटाला चिखल लागू नये म्हणून संजय राठोड यांनी महामार्गावरूनच पाहणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
Sanjay Rathod
Sanjay Rathod Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेडमध्ये मंत्री संजय राठोडांसमोर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी घेराव घालत हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा, अन्यथा अराजकता माजेल, अशा इशारा दिला. तर बुटाला चिखल लागू नये म्हणून संजय राठोड यांनी महामार्गावरूनच पाहणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत केली जात असल्याचा आरोप केला आहे. बियाण्याचा खर्च एकरी साडेतीन हजार रुपये झाला आहे. तर दुसरीकडे खताचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात झाला असताना सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसानीपोटी दिली जात असलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगत जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यासमोर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला

Sanjay Rathod
Uddhav Thackeray : धाराशिवमधील बांधावर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरेंचे मोठे आश्वासन; म्हणाले, 'हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत...'

मंत्री संजय राठोड नांदेड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करीत आहेत. मात्र, या परिसरात आल्यानंतर ते गाडीतून उतरून रस्त्यावरच थांबले होते. त्यांनी शेतात गेल्यानंतर बुटाला चिखल लागू नये म्हणून महामार्गावरूनच पाहणी केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

Sanjay Rathod
Uddhav Thackeray solution: कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणणार? अजितदादांची अडचण उद्धव ठाकरेंनी झटक्यात दूर केली

राज्यातील सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एकरी तीन हजार रुपये नुकसानीची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. त्यांना भिकाऱ्यासारखं वागवले जात असल्याचा संताप मंत्री राठोडांसमोर शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सरकारकडून मदत देत असताना शेतकऱ्याला हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. राज्य सरकारने एकरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना करायला हवी. त्यासाठी राज्य सरकारने शेतीची पाहणी न करता सरसकट मदत दिली पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे.

Sanjay Rathod
Ajit Pawar : अजितदादांनी घेतली शरद पवारांच्या आमदाराची फिरकी; ‘लोक आमदार-बिमदार झाल्यावर वाढतात, आपण...’

दरम्यान, राज्य सरकारने अडीच हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत तुटपुंजी आहे. संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी फक्त साडे आठ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांचे पीक सडून गेले आहे. शेत साफ करण्याचा खर्च, कर्जाचा खर्च मोठा आहे. जमिनीची वाताहत झाली आहे, ती नीट करण्याचा खर्च आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे गरजेचे असल्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

Sanjay Rathod
Ajit Pawar announcement: बीडमधील पाहणीनंतर अजित पवारांची मोठी घोषणा; आजपासूनच शेतकऱ्यांना केली जाणार इतक्या रुपयांची मदत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com