Nanded Politics : काँग्रेस-वंचितला डावलत एमआयएमचा विरोधी पक्षनेता नेमला; नांदेडच्या महापौर अडचणीत!

Nanded Municipal Corporation : नांदेड-वाघाळा महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने दावा केला होता. मात्र आता येथे महापौरांनी घेतलेल्या निर्णयामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
Nanded Municipal Corporation
Nanded Municipal Corporationsarkarnama
Published on
Updated on

High Court News : नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीत भाजपला शतप्रतिशत सत्ता मिळाली. खासदार अशोक चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीनूसार महापालिकेत कमळ फुलल्यानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व इतर महत्त्वाची सगळी पदं भाजपने राखली. विरोधी पक्षनेता नेमताना वरिष्ठांच्या आदेशानूसार महापौरांनी काँग्रेस-वंचितचा दावा फेटाळत हे पद एमआयएमच्या मकसुद खान यांना दिले. महापौर कविता मुळे यांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस-वंचित आघाडीसह इतर काही नगरसेवकांनी थेट न्यायालयात धाव घेतली. आता महापौरांचा हा निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

नांदेड-वाघाळा महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीने दावा केला होता. या दोन्ही पक्षांची निवडणुकीत आघाडी होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे संख्याबळ गृहित धरून विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळावे, असा या दोन्ही पक्षांचा आग्रह होता. परंतू काँग्रेस-वंचितला हे पद मिळू द्यायचे नाही, अशी रणनीती सत्ताधारी भाजपने आखली होती. त्यानूसार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एमआयएमच्या मकसुद खान यांना विरोधी पक्षनेता करण्यात आले होते.

महापौरांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस वंचित आघाडीच्या नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. कोर्टाने महापौरांची ही नियुक्ती तात्पुरती थांबवली आहे. त्यामुळे मकसुद खान हे आता विरोधी पक्षनेता म्हणून काम करू शकत नाहीत. कोर्टाने या प्रकरणात महापौर, आयुक्त आणि मकसुद खान यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसला सर्वांनी 22 जुलै 2026 पर्यंत उत्तर द्यायचे आहे. त्यादिवशी कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे.

Nanded Municipal Corporation
Nanded Politics: विलासरावांच्या उपकाराची चिखलीकरांकडून आठवण; अशोक चव्हाणांचीही कुरघोडी! कलगीतुरा रंगला

त्या दिवशी कोर्ट स्थगिती उठवणार की कायम ठेवणार, यावरूनच नांदेडमध्ये खरा विरोधी पक्षनेता कोण हे ठरणार आहे? या याचिकेसाठी अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचा कायदेशीर सल्लाही वंचित आघाडीने घेतला होता. आता 22 जुलैच्या कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस-वंचित आघाडीच्या दाव्यानूसार महापौरांनी एमआयएमच्या मकसुद खान यांची विरोधी पक्षनेते पदावर केलेली नियुक्ती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 9A(1) आणि 9A(2) नुसार चुकीची आहे.

सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या गटनेत्याशी चर्चा न करता नियुक्ती केली गेली आहे. याच कारणावरून काँग्रेस-वंचितच्या गटनेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्र. 1090 दाखल केली. कोर्टाने तातडीने या नियुक्तीला अंतरिम स्थगिती दिली. कोर्टाने महापौर, आयुक्त आणि विरोधी पक्षनेते यांना प्रतिवादी करून 22 जुलै 2026 पर्यंत उत्तर मागितले आहे.

Nanded Municipal Corporation
Nanded Politics: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात मोठा धमाका, ताकदवान नेता 'या' दिवशी हाती घेणार धनुष्यबाण

नांदेड-वाघाळा महापालिकेत काँग्रेसने 10 आणि वंचित बहुजन आघाडीने 5 जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्षांनी मिळून 15 जागांसह सर्वात मोठा विरोधी गट (आघाडी) स्थापन केला आहे. काँग्रेस-वंचित आघाडीने 'अब्दुल गफार अब्दुल सत्तार' यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची मागणी केली होती. दुसरीकडे, एमआयएम पक्षाकडे 14 नगरसेवक आहेत आणि त्यांनी 'मोहम्मद मसूद अहमद खान' यांच्या नावाची शिफारस केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com