Marathwada Graduate Election: सतीश चव्हाणांच्या विजयी चौकारातून अजितदादांना श्रद्धांजली अन सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करा

Satish Chavan's Fourth Win: उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत सतीश चव्हाण यांना विजयी करा आणि पक्षाची ताकद राज्यात वाढवा असे आवाहन केले.
Satish Chavan
Satish Chavan Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mahayuti News : अजितदादांच्या पश्चात होणाऱ्या मराठवाडा विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयाचा चौकार साकारून दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करा आणि त्यांच्या विचारांचा राजकीय वारसा पुढे चालवणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे हात बळकट करा, असा सूर सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ बीड आणि नांदेड येथे आयोजित पदवीधरांच्या मेळाव्यात काढण्यात आला.

मंत्री पंकजा मुंडे, ओबीसी मंत्री अतुल सावे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजपचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण, आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, श्रीजया चव्हाण, अमर राजूरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, माजी मंत्री संजय बनसोडे आदींच्या उपस्थितीत नांदेड आणि बीडमध्ये सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन सर्वच नेत्यांनी केले.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत सतीश चव्हाण यांना विजयी करा आणि पक्षाची ताकद राज्यात वाढवा असे आवाहन केले.

सतीश चव्हाण यांनी गेल्या अठरा वर्षात विधान परिषदेच्या सभागृहात पदवीधर, विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, महिला, युवक, शेतकरी-कष्टकरी अशा समाजातील सर्वच घटकांसाठी काम केले आणि त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. अठरा वर्षात त्यांनी काय केले? असा सवाल विरोधक विचारतात, अठरा वर्षात त्यांनी पदवीधरांसह सर्व समाज घटकांचे अनेक प्रश्न सभागृहात मांडले आणि ते सोडवूनही घेतले.

Satish Chavan
CJP News: जामीन मंजूर होताच अभिजीत दिपके पुन्हा मैदानात, नवं ट्विट; दास-रांका यांचा फोटो अन् 'ती' कॅप्शन, 'सीजेपी'ची लवकरच मोठी घोषणा..?

परंतु गेल्या सहा वर्षातीलच त्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर विधान परिषदेत त्यांनी सहा वर्षात ६७७ तारांकित प्रश्न, ९७ लक्षवेधी, ५५ वेळा अर्ध्या तासाच्या चर्चेत सहभाग, १०७ विशेष उल्लेख आणि नियम २६० च्या चर्चेमध्ये २२ वेळा सहभाग घेत विविध आयुधांचा वापर करत सर्व समाज घटकांचे प्रश्न सभागृहात मांडले आणि सोडवले, अशा शब्दात सतीश चव्हाण यांच्या कामाचे कौतुक केले.

सतीश चव्हाण यांना अजित पवारांनी विश्वासाने उमेदवारी दिली. त्यानंतर ते सलग निवडून आले. विधीमंडळात जोरदारपणे सर्वसामान्यांचे व पदवीधरांचे मुद्दे मांडणे आणि न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे अशी सतीश चव्हाण यांची कार्यपद्धती राहीली आहे.

Satish Chavan
Mahayuti Government News: सचिन अहिर अन् बनसोडेंना मोठा धक्का; उपसभापती-उपाध्यक्षांचा महत्त्वाचा अधिकार काढला, नार्वेकर-शिंदेंची वाढली 'पॉवर'

त्यांचा कार्यपूर्ती अहवाल मी पाहिला, सोशल मिडियावर काहीही असू द्या, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते. इथे आल्यानंतर नेहमीच आपुलकीची, आपलेपणाची भावना असते. मराठवाड्याच्या मातीत माझा जन्म झाला. अजितदादांच्या पश्चात या बीड जिल्ह्याच्या पालकत्त्वाची जबाबदारी असल्याने आता माझी ही कर्मभूमि झाली आहे. जी विकासाची कामी अजितदादांनी सुरू केली होती, स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याचा शब्द आपण पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे. यापुढेही अनेक विकास कामे करायची आहेत, त्यासाठी आपल्या पक्षाची ताकदही वाढली पाहिजे. त्यामुळे सतीश चव्हाण यांना निवडून आणायचे आहे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी बीड आणि नांदेडच्या मेळाव्यात पदवीधरांना केले.

तीनवेळा मतदारांनी निवडून दिले...

या मेळाव्यात बोलताना सतीश चव्हाण यांनी दिवंगत नेते अजित पवार यांची आवर्जून आठवण काढली. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कधीही त्यांनी अवास्तव आश्वासने मला देऊ दिली नाही, सतीश जे होणार आहे तेच लोकांना सांगावे, असे ते म्हणायचे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात शेवटी त्यांचा मला फोन असायचा. आज तो फोन मला येणार नाही, असे असले तरी सुनेत्रा वहिनी यांनीही ती कमतरता भरून काढली आहे, अशा शब्दात सतीश चव्हाण यांनी अजित दादांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

Satish Chavan
MLC Election : अमरावती मतदारसंघात ट्विस्ट! मोठ्या शिक्षक संघटनेची पलटी; अधिकृत उमेदवाराला नारळ देत भाजप नेत्याच्या बहिणीला पाठिंबा

अठरा वर्षात काय केले या विरोधकांच्या प्रश्नाला, माझ्या तीन निवडणुकीतील वाढते मताधिक्य आणि विजय हीच मराठवाड्यातील पदवीधरांनी माझ्या कामाची दिलेली पावती असल्याचे सतीश चव्हाण म्हणाले. बीड जिल्ह्याचा माझ्या तीनही विजयात सिंहाचा वाटा होता अजितदादा आज आपल्यात नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनात गेल्या तीन निवडणूका मी जिंकलो. दादांचा हात माझ्यापाठीशी नाही, याची जाणीव उमेदवारी अर्ज दाखल करताना सातत्याने होत होती.

पहिल्या निवडणुकीत तीन हजार मतांनी निवडून आलो, नंतर अठरा हजार हजार आणि गेल्या निवडणूकीत सत्तर हजार मतांनी विजयी झालो. शिक्षकांचा कायम शब्द काढला, त्यांच्या अनुदानाचा प्रश्न सोडवला, मेडिकलचा ७०-३० चा फाॅर्मूला आम्ही रद्द केला. परिणामी मराठवाड्यातील हजार मुलं अधिकची मेडिकलला प्रवेश घेऊ शकत आहेत. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी, उद्योगांसाठी आवाज उठवला. प्रसंगी स्व‍कीयांशी भांडलो, असेही चव्हाण म्हणाले.

मी सगळ्यांचा आमदार म्हणून काम केले, माझ्याकडे येणाऱ्याची जात कधी मी पाहिली नाही. मराठवाड्यात नोकऱ्यांची कमतरता नाही, माझं एकच स्वप्न आहे, मराठवाड्याचा विद्यार्थी इथे शिकला पाहिजे, इथं घडला पाहिजे आणि इथेच त्याचा हाताला काम मिळाले पाहिजे, एवढ्या मोठ्या संस्था, उद्योग या भागात आले पाहिजेत यासाठी आपण पुढील काळात काम करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com