Abhijeet Dipke: "पोलीस येताहेत..." अभिजीत दिपकेंना अटक होणार? स्वतः व्हिडिओद्वारे दिली माहिती; तरुणांना केलं महत्वाचं आवाहन

Abhijeet Dipke: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुन्हा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन याच मैदानावर पुढे सुरु ठेवण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignationSarkarnama
Published on
Updated on

Abhijeet Dipke: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचं आज पुन्हा दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन याच मैदानावर पुढे सुरु ठेवण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्याचबरोबर ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे त्या अभिजीत दिपके हे मात्र जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत याच मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम आहेत. त्यामुळं आता पोलीस त्यांना अटक करण्यासाठी येत असल्याची माहिती स्वतः दिपके यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे.

Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
माहिती अधिकार अर्जाचे नियम बदलले! 'या' चुका झाल्यास माहितीपासून वंचित राहाल

अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच पार्टीच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा लाईव्ह व्हिडिओ केला आहे. यात दिपके म्हणतात, आमचं शांततापूर्ण आंदोलन पुढे चालू ठेवण्याची आमची विनंती पोलिसांनी फेटाळली आहे. तसंच ते आता मला अटक करण्यासाठी येत आहेत, कोणत्याही क्षणी पोलीस इथे पोहोचतील. त्यामुळं आता या दडपशाहीविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही या देशातील सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि ज्यांना देशाच्या शिक्षण व्यवस्थेची काळजी वाटते अशा प्रत्येकाला विनंती करतो की, कृपया त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर यावे.

Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
Raj Thackeray: शिवसेनेच्या खासदार फुटीवर अखेर राज ठाकरे बोलले; म्हणाले, बरं झालं...

ज्या पण राज्यातील लोक हा व्हिडिओ पाहात आहेत त्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये जलभरो आंदोलन सुरु करावं. काहीही झालं तरी आपलं आंदोलन थांबता कामा नये. पण एक आणखी सांगतो की, जे काही तुम्हाला निषेध आंदोलन करायचं आहे ते शांततापूर्ण करावं. कारण आता आम्हाला दिल्ली पोलीस आम्हाला इथून उचलतील पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की, या चळवळीला आता तुम्ही पुढे न्यावं आणि शांततापूर्ण वातावरणात जेलभरो आंदोलनाची सुरुवात करावी.

Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
Pawanraje Nimbalkar Case: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरण: कोर्टाकडून झटका; निकालानंतर सीबीआयचा काही मिनिटांतच मोठा निर्णय

दरम्यान, अभिजीत दिपके यानं आधी इन्स्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टीचं पेज सुरु केलं. जसं या पेजची माहिती तरुणांना मिळाली त्याला तुफान प्रतिसाद लाभला. केवळ दोनच दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टापेजला एक कोटीहून अधिक फॉलोवर्स लाभले. त्यामुळं खरंतर सर्वच जणांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण कॉक्रोच पार्टीला अल्पावधीत देशभरातून मिळालेला प्रतिसाद हे देशातील तरुणांमध्ये परीक्षा पेपरफुटीविरोधात असलेली खदखद दाखवत होतं. त्यानंतर या आंदोलनाची देशभरात चर्चा सुरु झाली, त्यावर सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून टीका टिप्पणी आणि आरोपही व्हायला लागले. त्यावेळी हे भारतातल्या जेनझींचं आंदोलन केवळ सोशल मीडियापुरतेच मर्यादित राहील असंही बोललं जात होतं.

Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
Pawan RajeNimbalkar: पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणी कोर्टानं कुठल्या मुद्द्यांच्या आधारे ओरोपींची निर्दोष मुक्तता केली? कोर्टात नेमकं काय घडलं?

पण या चळवळीचा जनक असलेल्या अभिजीत दिपके यानं अमेरिकेतून भारतात परत येत असल्याचं जाहीर केलं. तत्पूर्वी त्यांनी भारतात आपले तीन प्रवक्तेही नेमले या प्रवक्तांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येणार असून त्यासाठी अभिजीत दिपके भारतात परतत असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार, दिपके दिल्लीच्या विमानतळावर उतरले त्यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक पुस्तक होतं. यावरुन त्यानं आंदोलनाची दिशा आणि हेतू स्पष्ट केला. त्यानंतर दिपकेंच्या उपस्थितीत दिल्लीत पहिलं आंदोलन पार पडलं. त्यानंतर दुसरं आंदोलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, त्यानंतर तिसरं आंदोलन बंगळुरु त्यानंतर चौथं आंदोलन राजस्थानात आणि त्यानंतर पुन्हा पाचवं आंदोलन हे दिल्लीच्या जंतरमंतरवर आज करण्यात आलं. यानंतर याच मैदानावर जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com