Rahul Gandhi: 'कॉक्रोच' आंदोलनानंतर काँग्रेसला आली जाग! राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोदी सरकार विरोधात मोठी घोषणा

Rahul Gandhi: अखिल भारतीय स्तरावरील परीक्षांचे पेपर फुटीविरोधात तसंच बेरोजगारीविरोधात कॉक्रोच जनता पार्टी या चळवळीच्यावतीनं झेनझी तरुणांची उत्स्फुर्तपणे देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु झाली आहेत.
Rahul Gandhi_Cockroach Janata Party
Rahul Gandhi_Cockroach Janata Party
Published on
Updated on

Rahul Gandhi: अखिल भारतीय स्तरावरील परीक्षांचे पेपर फुटीविरोधात तसंच बेरोजगारीविरोधात कॉक्रोच जनता पार्टी या चळवळीच्यावतीनं झेनझी तरुणांची उत्स्फुर्तपणे देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु झाली आहेत. या आंदोलनाबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना आणि कॉक्रोच पार्टीची ही आंदोलनं अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न सुरु असताना सरकारविरोधातील इतर राजकीय काहीसे थंडावले होते. पण यावरुनच टीका होऊ लागल्यानंतर आता काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारविरोधात मोठी घोषणा काँग्रेसनं केली आहे.

Rahul Gandhi_Cockroach Janata Party
SC Sub Classification: महाराष्ट्रात गुपचूप अनुसुचित जातींचं उपवर्गीकरण लागू? शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या जाहिरातीवरुन नवा वाद

काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या मोहिमेची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं की, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं पेपरलीक, परीक्षांमधील गोंधळ, बेरोजगारी आणि मोदी सरकारद्वारे भारतातील तरुणांसोबत केला जात असलेल्या सुनियोजित विश्वासघाताविरोधात देशव्यापी अभियानाच्या पहिल्या टप्प्याची घोषणा आम्ही करत आहोत. विद्यार्थी, परीक्षांची तयारी करणारे तरुण, तरुणांच्या संघटना, शिक्षक आणि परीक्षा घोटाळ्यांचा फटका बसलेल्या इतर लोकांनीही काँग्रेसच्या या अभियानात सामिल व्हावं.

Rahul Gandhi_Cockroach Janata Party
PNB Scam: मोठी बातमी! नीरव मोदीच्या PNB घोटाळा संबंधित प्रकरणात भ्रष्टाचार नाही! CBIला मिळाले नाहीत पुरावे

कोटातून सुरु होणार अभियान

या अभियानाची सुरुवात राजस्थानातील कोटा इथून सुरुवात होणार आहे. वेणुगोपाल यांनी सांगितलं की, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी १७ जून रोजी कोटा इथून या अभियानाची सुरुवात करतील. यानंतर १० जुलै रोजी प्रयागराज, ११ जुलै रोजी पाटणा आणि १४ जुलैला दिल्लीत मोठा कार्यक्रम गेऊन केंद्र सरकारपर्यंत आपलं म्हणणं मांडणार आहोत. काँग्रेसनं ८ जून रोजी आपल्या सरचिटणीस, प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला होता की, नीट परीक्षा प्रकरण, बेरोजगारी आणि महागाईविरोदात राष्ट्रव्यापी आंदोलन केलं जाईल.

Rahul Gandhi_Cockroach Janata Party
NCP Pune: सुनेत्रा पवारांची पुण्यात डिनर डिप्लोमसी; 'शिवाई' बंगल्यावरील 'त्या' गुपित बैठकीची इनसाईड स्टोरी!

प्रधानांचा राजीनामा घेणार

वेणुगोपाल यांनी पुढे सांगितलं की, या अभियानामार्फत NEET चं विकेंद्रीकरण, परीक्षा शुल्क माफी, पेपर लीक रॅकेट यामध्ये सहभागी असलेल्या लोकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करणे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल. भारतातील त्या लाखो तरुणांच्या अडचणी याद्वारे समोर आणल्या जातील. ज्यांचं भविष्य पेपरफुटी, परीक्षांचा वाढता खर्च आणि निष्पक्ष व पारदर्शक भरती आणि शिक्षण प्रणाली निश्चित करण्यात सरकारचं अपयश यामुळं अनेकदा अडचणी वाढत आहेत.

Rahul Gandhi_Cockroach Janata Party
Mahayuti Dispute : साताऱ्यात मोठी घडामोड : महायुतीच्या बैठकीला मकरंदआबा, शंभूराज देसाईंची दांडी; भाजपवर राग कायम

काँग्रेसच्या विंग रस्त्यावर उतरणार

या देशव्यापी अभियानात काँग्रेस देशभरात एनएसयूआय, युवा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस कमिटी, जिल्हा काँग्रेस कमिटी आणि स्थानिक संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना एकत्र करण्याच्या राहुल गांधी यांच्या आवाहनाला पुढे नेणार आहोत. लोकांमध्ये जाऊन, डिजिटल माध्यमाद्वारे, कँपसमध्ये जाऊन संपर्क साधून, कोचिंग सेंटर्सला भेटी देऊन, विद्यापीठं, शाळा आणि युवा केंद्रांवर चर्चा करण्यात येतील, त्याचबरोबर सोशल मीडियातून अभियान, लाईव्ह स्क्रीनिंग आणि विद्यार्थ्यांसोबत थेट संवाद यांसारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहेत, असंही वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com