Santosh Deshmukh Case : "जरांगेंच्या नादाला लागू नका, अन्यथा..."; लक्ष्मण हाकेंचा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय यांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?

Laxman Hake On Anjali Damania : "आमच्या ओबीसी मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर या राज्यातील ओबीसी बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. त्या नेत्याच्या संरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरेल. तर अंजलीताई दमानिया यांचं नाव अंजली दलालिया असं ठेवावं."
Manoj Jarange Patil, Santosh Deshmukh, Dhananjay Deshmukh, Laxman Hake, Dhananjay Munde
Manoj Jarange Patil, Santosh Deshmukh, Dhananjay Deshmukh, Laxman Hake, Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 05 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं हत्या प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासून चांगलंच लावून धरलं आहे. या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असा आरोप होत असलेला वाल्मिक कराडने मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यामुळेच अनेक मोठे घोटाळे केल्याचा आरोप करत दमानिया यांनी मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

शिवाय त्यांनी मंगळवारी कृषिमंत्री असताना धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) मोठा घोटाळा केल्याचा आणखी एक आरोप केला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, दमानिया यांच्यावर टीका करताना हाके यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना मनोज जरांगे पाटील यांच्या नादला लागू नये असा सल्ला देखील दिला आहे.

लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, आमच्या ओबीसी मंत्र्याला मीडिया ट्रायलद्वारे धमकावण्याचं काम होत असेल तर या राज्यातील ओबीसी बांधव ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. त्या नेत्याच्या संरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरेल. तर अंजलीताई दमानिया (Anjali Damania) यांचं नाव अंजली दलालिया असं ठेवावं.

Manoj Jarange Patil, Santosh Deshmukh, Dhananjay Deshmukh, Laxman Hake, Dhananjay Munde
Devendra Fadnavis in Beed : सुरेश धसांमुळे CM फडणवीस आज बीडमध्ये; पण धनंजय मुंडे 'त्या' कार्यक्रमाला गैरहजर राहणार, मोठं कारण आलं समोर

निवडक नेत्यांची प्रकरणं उरकून काढायची आणि त्यांना राजकारणातून संपवायचं हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. दमानिया यांनी जेवढी प्रकरण बाहेर काढली त्यांचं पुढे काय झालं? हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्या फक्त मीडियात स्पेस शोधण्याचं काम करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असं म्हणत त्यांनी दमानिया यांच्यावर हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) नादी लागू नये अन्यथा दुर्दैवाने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली. हाके म्हणाले, "धनंजय देशमुखांची पहिल्या दिवसापासून समतोल भूमिका आहे.

Manoj Jarange Patil, Santosh Deshmukh, Dhananjay Deshmukh, Laxman Hake, Dhananjay Munde
BJP News : सीएम फडणवीसांची 'मास्टर' खेळी; अजितदादा अन् शिंदेंच्या पालकमंत्र्यांसाठी धोक्याची घंटा

मात्र, त्यांनी मनोज जरांगेच्या नादाला लागू नये. जरांगे दोन वर्षापासून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. मी धनंजय देशमुखांच्या भूमिकेचं पहिल्या दिवसापासून स्वागत केलं आहे. मात्र, ते जरांगेच्या नादाला लागले तर दुर्दैवाने या घटनेचे गांभीर्य कमी होऊ शकते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com