Buldhana Politic's : संजय गायकवाडांचा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदारास धक्का; 30 गावांतील भाजपसह विविध पक्ष पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Sanjay Gaikwad Vs Shweta Mahale : बुलडाण्यात शिवसेना-भाजप संघर्ष तीव्र झाला असून संजय गायकवाड यांनी विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश देत राजकीय समीकरणे बदलली आहेत.
Chikhli
Chikhli
Published on
Updated on

Buldhana, 28 March : गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात शिवसेना आणि भारतीय जतना पक्षामध्ये जोरदार कलगीतुरा सुरू आहे. त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी चिखलीत आमदार श्वेता महाले यांना जोरदार धक्का देत ३० गावांतील भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, वंचित आदी पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चिखलीतील ३५ ते ४० गावांतील विविध पक्षांचे शेकडो पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे, त्यामुळे भाजपला चिखलीत खिंडार पडले आहे.

शिवसेना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी आमदार श्वेता महाले यांच्यावर टीका केली. कार्यकर्त्यांचा छळ किती करायचा. चिखली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा भयानक छळ केला जातो. जेव्हापासून माझ्याकडं प्रकरण आलं, आता कोणाची माय....हे मी पाहतो त्रास देणाऱ्यांना. आम्ही तर मैदानातील, आखाड्यातील आहोत, तुम्ही तर घरातील...असा टोलाही गायकवाड यांनी आमदार महाले यांना लगावला.

Chikhli
Satara News : सातारा राड्यानंतर शंभूराज देसाई अन SP तुषार दोशी प्रथमच एकत्र; एसपीबाबत म्हणाले ‘त्यांची का अडचण करता, मला खासगीत विचारा...’

गायकवाड म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. चिखली तालुक्यात आपल्याला शिवसेना ताकदीने वाढवायची आहे. पुढची लोकसभा कोण लढवणार हे तुम्हाला माहिती आहेच. आज तरी शिवसेनेचा खासदार आहे. विधानसभेचं काय होईल, याचीही चिंता तुम्ही करू नका. तुम्ही ताकद वाढवत चला, तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ. पक्ष म्हणून चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे. या मतदारसंघाचा शिवसेनेचा मी प्रमुख आहे.

Chikhli
Satara ZP update : साताऱ्यात मोठी घडामोड; शंभूराज देसाईंची कलेक्टरच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांशी चर्चा, महाबळेश्वर कोर्टाचाही पोलिसांना आदेश...

माझा कार्यकर्ता माझ्यासाठी जीव की प्राण आहे. कार्यकर्त्याचे दुःख हेच माझे दुःख आहे. मी १९८६ पासून चिखली येत आहे. गाव अन्‌ गाव फिरलो. आजही शिवसेनेचे कार्यकर्ते माझी वाट पाहत थांबत आहेत. मी शिवसेनेची टीम उभी केली. त्या कार्यकर्त्यांना मी तुमच्या मागे उभे केले आणि तुम्ही त्यांना त्रास देणार असाल तर त्यांच्यासाठी हा आमदार संजय गायकवाड सक्षम आहे, असे आमदार गायकवाड यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com