Parbhani BJP conflict : भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर, नगरसेवकांनी महानगराध्यक्षाविरोधात दंड थोपटले; तर भरोसेंकडून बेशिस्तीचा ठपका!

Parbhani news politics News : स्वीकृत सदस्य पदासाठी गटनेत्याकडून भरोसे यांच्या नावाची शिफारस येताच भाजपच्या बारा पैकी अकरा नगरसेवकांनी त्यांचा नावाला विरोध दर्शवत गटनेताच बदलण्याची मागणी केली.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Municipal Corporation News : परभणी भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. भाजपचे महानगराध्यक्ष शिवाजी भरोसेविरूद्ध महापालिकेतील पक्षाचे नगरसेवक यांच्यात सध्या चांगलीच जुंपली आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी गटनेत्याकडून भरोसे यांच्या नावाची शिफारस येताच भाजपच्या बारा पैकी अकरा नगरसेवकांनी त्यांचा नावाला विरोध दर्शवत गटनेताच बदलण्याची मागणी केली.

तर पक्षशिस्तीचा आरोप करत या नगरसेवक व काही पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्रच भरोसे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवले. या वादातून स्वीकृत नगरसेवक पदाची निवड रखडली असून महानगर प्रमुख विरुद्ध नगरसेवक, पदाधिकारी अशी उभी फूट परभणीमध्ये पडल्याचे चित्र आहे.

BJP Flag
Shripad Chindam : हकालपट्टी की राजकारण? छिंदमचा आरोप; “माझ्या जीवाला धोका, आमदार जबाबदार!”

पक्षाचे काही नगरसवेक आणि पदाधिकारी हे सातत्याने पक्षाच्या बैठका, पत्रकार परिषद, प्रशिक्षण कार्यशाळांना दांडी मारत आहेत. यामुळे पक्षशिस्त धोक्यात येत असून या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई व त्यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवाजी भरोसे यांनी प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात नऊ नगरसेवक गैरहजर होते, असे सांगत या नगरसेवकांची यादीच पत्रात देण्यात आली आहे.

BJP Flag
Sanjay Kenekar: महाराष्ट्रात देवाभाऊंचं राज्य! कायदा मोडेल, त्याचं कंबरडं मोडू; संजय केणेकरांचा एमआयएमला इशारा

यात प्रामुख्याने डाॅ. केदार खटिंग, रितेश झांबड, मीना वरपूडकर, गिरीजा शंकर आजेगावकर, गणेश टाक, विश्वजीत बुधवंत या नगरसेवकांच्या सातत्याने गैरहजर राहण्याने पक्षाच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप भरोसे यांनी आपल्या पत्रात केला आहे. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांच्याकडून सातत्याने पक्षविरोधी कारावायांमध्ये सक्रीय सहभाग असतो, असा आरोपही करण्यात आला आहे.

BJP Flag
Shrikant Shinde Politics : श्रीकांत शिंदे 'बाजीगर', तर राजू पाटील 'रियल धुरंधर'; महापौर पदावरून भाजपला डिवचले

स्वीकृत सदस्य निवड रखडली..

महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे व महापालिकेतील भाजप नगरसेवकांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. याचा परिणाम स्वीकृत सदस्य पदाची निवड आणि स्थायी समिती सदस्यांच्या नावाची घोषणा रखडली आहे. भाजपच्या महापालिकेतील गटनेत्या तिरुमला खिल्लारे यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी शिवाजी भरोसे यांच्या नावाची शिफारस महापौर इकबाल सय्यद यांच्याकडे केली होती. त्याला भाजपच्या अकरा नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे ही निवडही रखडली आहे.

BJP Flag
BJP Politics: नाशिकमध्ये भाजप विरुद्ध भाजप संघर्षाची ठिणगी; आमदार देवाभाऊंचा दरबार गाठण्याच्या तयारीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com