Parbhani BJP Politics : `पार्टी विथ डिफरन्स` आजी-माजी आमदारांकडून एकाचवेळी कार्यक्रम घेत कुरघोडी...

Marathwada Political News : पाथरी विधानसभा समन्वयकपदी डॉ. सुभाष कदम यांना बदलून मोहन फड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
Parbhani Bjp Politics News
Parbhani Bjp Politics NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Political News : परभणी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस वाढत असून, गटबाजीचे जाहीर प्रदर्शन होताना दिसत आहे. शनिवार, दि. ७ रोजी मानवत येथे दोन्ही गटाने शक्तिप्रदर्शन केले. (Parbhnai News) शहरातील माहेश्वरी मंगल कार्यालयात किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे उपस्थित होते. मात्र, पक्षाचे पाथरी विधानसभा प्रमुख माजी आमदार मोहन फड हे कार्यक्रमास अनुपस्थित होते.

Parbhani Bjp Politics News
MNS On Loksabha : प्रकाश महाजनांच्या उमेदवारीने कोणाचं चांगभलं होणार ?

त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वाघेश्वर गार्डन येथे लोकसभा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. (BJP) इंद्रायणी मित्र मंडळाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असलेले मोहन फड २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. शिवसेना आमदार मीरा रेंगे यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला होता. (Parbhani) देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागताच मोहन फड यांनी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला होता.

पाथरी मतदारसंघातील मानवत येथे सर्वात जास्त विकासनिधी त्यांनी खेचून आणला. नंतर फड यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. (Meghna Bordikar) मात्र, अतिशय कमी कालावधीतच त्यांनी शिवसेना सोडून भाजपशी सलगी केली. लोकसभा निवडणुकीत फड यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली. मात्र, त्यांचा पराभव झाला.

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी करताना संभाव्य उमेदवारांची विधानसभा समन्वयक म्हणून नियुक्त्या केल्या. त्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांची पाथरी विधानसभा समन्वयक म्हणून निवड करण्यात आली. डॉ. सुभाष कदम यांनी जोरात तयारी सुरू करत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात शक्तिप्रदर्शन करत पाथरी शहरात वॉर रूमचे उद्घाटन केले. यामुळे माजी आमदार मोहन फड अचानक सक्रिय झाले आणि सूत्रे फिरली.

पाथरी विधानसभा समन्वयकपदी डॉ. सुभाष कदम यांना बदलून मोहन फड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी भाजपच्या जाहीर केलेल्या कार्यकारिणीत पाथरी विधानसभा मतदारसंघातील नियुक्त्यामध्ये मोहन फड यांचा प्रभाव दिसून आला. विशेषत: नियुक्त झालेले पदाधिकारी हे भाजपपेक्षा मोहन फड यांच्या इंद्रायणी मित्र मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांनी केला. कार्यकारिणी निवडीनंतर अंतर्गत धुसफूस चालू होती.

Parbhani Bjp Politics News
Nanded Loksabha Constituency : पुन्हा अशोक चव्हाण ? की काॅंग्रेस देणार नव्या चेहऱ्याला संधी...

मोहन फड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असणारा गट सक्रिय होत होता आणि शनिवारी मानवत येथे लोकसभा आढावा बैठकीचे आयोजन केले असतानाचा मुहूर्त साधून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पाथरी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचे शहर असलेल्या मानवत येथे लोकसभा आढावा बैठक आयोजित केली असताना पक्षातील एका गटाने किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके यांच्या सत्काराचा कार्यक्रम मानवत येथे आयोजित करून योग्य तो संदेश दिल्याचे बोलले जात आहे. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्षात गटबाजी होऊन चव्हाट्यावर येणे हे पक्षाच्या भवितव्याला शुभ संकेत नसल्याचे जुन्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.