Ratnakar Gutte News : आमदार रत्नाकर गुट्टेंना दुखापत : घरातूनच हाकणार तीन तालुक्यांचा कारभार

Gangakhed MLA News : आमदार रत्नाकर गुट्टे हे गेल्या काही दिवसांपासून गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे उपचार घेत आहेत. अजून दीड ते दोन महिने त्यांना बाहेर फिरता येणार नाही.
MLA Ratnakar Gutte
MLA Ratnakar GutteSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Politics News : आमदार रत्नाकर गुट्टे हे गेल्या काही दिवसांपासून गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे उपचार घेत आहेत. अजून दीड ते दोन महिने त्यांना बाहेर फिरता येणार नाही. डाॅक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी मतदारसंघातील जनतेला आवाहन करणारी एक पोस्ट समाज माध्यमांवर टाकली. त्यात मी बाहेर फिरू शकणार नसलो, तरी माझे गंगाखेड, पालम, पूर्णा या तीनही तालुक्यांवर लक्ष असल्याचे आणि या भागातील सगळ्या समस्या सोडवणार असल्याचे म्हटले आहे.

रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड मतदारसंघातून सलग दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ते आमदार असले तरी आता त्यांनी भाजपशी (BJP) जवळीक वाढल्याचे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतून दिसून आले होते. मतदारसंघावर प्रचंड पकड असलेले परंतु तितकेच वादग्रस्त असलेले गुट्टे हे मतदारसंघात किंगमेकरच्या भूमिकेत असतात.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Politics Live Update : तामिळनाडूत फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट; 16 कामगारांचा मृत्यू

महिनाभरापुर्वी घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा पासून ते घरातच उपचार घेत आहेत. उपचारासाठी आणखी दीड ते महिने त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात मतदारसंघात फिरता येणार नाही, याची खंत व्यक्त करणारी त्यांनी केलेली सविस्तर फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

MLA Ratnakar Gutte
Ashok Kharat Case : तुळजापुरात पाऊल ठेवताच सुनील तटकरेंचे भोंदूबाबा खरात प्रकरणी मोठे वक्तव्य; थेट म्हणाले,'विकृत मनोवृत्तीला ठेचून....'

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! आज मी आपल्याशी मनमोकळेपणाने बोलून कळकळीचे आवाहन करण्यासाठी ही पोस्ट लिहिली आहे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की, गेल्या काही महिन्यांपूर्वी घसरून पडल्यामुळे माझ्या पायाला आणि गुडघ्याला जबर दुखापत झाली आहे. त्यामुळे सध्या माझ्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी जवळपास 60 टक्के उपचार पूर्ण झाले आहेत. मात्र, आणखी 40 टक्के उपचार आणि त्यासाठी आराम करणे सक्तीचे असल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले आहे.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Politics Live Update: माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधातला कारवाईचा फास आवळला; मालमत्ता जप्त होणार

त्यामुळे संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला पुढील दीड ते दोन महिने पूर्ण विश्रांती घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ही गोष्ट सांगताना मनात खंत आणि दुःख सुद्धा आहे. कारण, या काळात मला आपल्यामध्ये प्रत्यक्ष येऊन किंवा आपल्याला भेटून आपल्या समस्या ऐकता येणार नाहीत. पण तरीही मी आपल्यापासून दूर नाही, फक्त काही दिवस आरोग्यविषयक परिस्थितीमुळे विश्रांती घ्यावी लागत आहे. मी जरी उपचार घेत असलो, तरी माझं पूर्ण लक्ष गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तिन्ही तालुक्यांतील प्रत्येक घडामोडीवर आहे.

MLA Ratnakar Gutte
Pawan Rajenimbalkar murder case: पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालाची तारीख ठरली; सुपुत्र, खासदार ओम राजेनिंबाळकरांना मात्र वेगळीच चिंता अन् खंत...

त्या दृष्टीने दररोज मी माझ्या स्वीय सहाय्यकांशी आणि जनसंपर्क कार्यालयातील प्रमुख कर्मचाऱ्यांशी शिवाय तिन्ही तालुक्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. त्यामुळे आपल्याला कोणतेही अडचण येणार नाही, याची मी विशेष काळजी घेत आहे. मला कल्पना आहे की, आपल्याकडे दररोज सायंकाळी 6 ते 10 या वेळेत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातून अनेक समस्या व अडचणी निर्माण झाल्या आहेत.

विशेषत: महिलांसाठी घरातील कामे आणि स्वयंपाकासाठी हा वेळ असतो. त्यामुळे त्यांची अडचण तातडीने लक्षात घेऊन मी आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई येथील मुख्य कार्यालयातील औंढेकर, गडकरी या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कारण, माझ्यासाठी महिलांचा हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी थेट मुंबई येथे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात काम पूर्ण होईल.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Politics Live Update: माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधातला कारवाईचा फास आवळला; मालमत्ता जप्त होणार

त्यासोबतच आपण तब्बल 50 ट्रान्सफरची मागणी केली आहे. त्यामुळे गावठाणचा काही डीपीचा प्रॉब्लेम असेल, तर आपण सर्वांनी तात्काळ माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आपली अडचण दूर करावी. तसेच सध्या राज्यासह मराठवाड्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता नागरिकांच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरत आहे. एप्रिल अखेरपासूनच तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचा धोका वाढला असून, प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.

मंडळी, आपल्या सेवेसाठी माझी तिन्हीही जनसंपर्क कार्यालये पूर्ववत सुरू आहेत. तसेच माझे स्वीय सहाय्यक, कार्यालयीन कर्मचारी आणि माझा भ्रमणध्वनी हे सर्व आपल्यासाठी 24 तास उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण असेल, समस्या, मागणी किंवा प्रश्न असेल, तर निःसंकोचपणे संपर्क साधा. मी स्वतः त्या प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवून आहे, आणि त्या मार्गी लागाव्यात यासाठी आवश्यक त्या सूचना देत आहे.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Politics Live Update: माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधातला कारवाईचा फास आवळला; मालमत्ता जप्त होणार

साथ कायम राहू द्या..

तरीही आपली मुंबई येथील काही कामे असतील तर माझे स्वीय सहाय्यक विकास तोंडे आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी स्वीय सहाय्यक बाळासाहेब पवार तसेच आरोग्यविषयक काही अडचणी असतील तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आरोग्यदूत प्रभाकर सातपुते यांच्या आपण संपर्क करू शकता. तशा सूचना मी त्यांना सुध्दा आहेत. त्यामुळे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, याची मला खात्री आहे.

मला पूर्ण जाणीव आहे की, जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपल्यामध्ये राहणे, आपल्या सुख-दुःखात सहभागी होणे ही माझी जबाबदारी आहे… आणि म्हणूनच या काळात प्रत्यक्ष उपस्थित राहता येत नसल्याची खंत मला सतत जाणवत आहे. पण त्याचवेळी मी आपल्याला विश्वास देतो की, आपल्या सेवेत कुठलाही खंड पडू देणार नाही. तसेच आपल्याला कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मी प्रत्येक यंत्रणा सक्रिय ठेवली आहे. मंडळी, आपला विश्वास, आपले प्रेम आणि आपली साथ हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ आहे.

MLA Ratnakar Gutte
Maharashtra News Live Update : 'धर्म विचारून वार करणं म्हणजे यांची मग्रुरी...'; पडळकरांची मीरा रोड चाकूहल्लाप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया

याच बळावर मी लवकरात लवकर पूर्ण बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत, आपल्या भेटीसाठी हजर होईन, याची मला खात्री आहे. तोपर्यंत, आपण सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, एकमेकांना साथ द्यावी… आणि कुठलीही गरज भासल्यास माझ्या कार्यालयाशी नक्की संपर्क साधावा. लक्षात ठेवा, मी थोडा दूर आहे, पण आपल्यासाठीच आहे… आणि सदैव आपल्या सोबतच आहे. त्यामुळे आपला विश्वास आणि साथ कायम अशीच राहू द्या… कारण, मी तुमच्यासाठीच आहे, आणि सदैव तुमच्यासोबतच राहीन. धन्यवाद!

MLA Ratnakar Gutte
Maharashtra Politics Live Update: माजी महापौर अभिषेक कळमकर विरोधातला कारवाईचा फास आवळला; मालमत्ता जप्त होणार
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com