Sambhaji Nagar: MIMच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल! आयुक्तांची भेट घेत, चर्चा होऊनही पक्षपातीपणे कारवाईचा केला आरोप

Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात अतिक्रमण हटाव पथकाच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याबद्दल एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Published on
Updated on

MIM Action : छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात अतिक्रमण हटाव पथकाच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याबद्दल एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका उपायुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईने एमआयएम नगरसेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Top 10 News: धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचे पंख छाटले? ते 'त्या' नावांमधून हटविला मागासवर्गीय शब्द

शहागंज भागात चार दिवसांपूर्वी घडलेल्या एका मारहाणीच्या प्रकरणाला राजकीय वळण दिले गेल्याचा आरोप केला जात आहे. रस्त्यावर अतिक्रमण करत मुजोरी करणाऱ्या काही फळ विक्रेत्यांनी एका पाच महिन्याच्या गर्भवती महिलेसह तिच्या पती आणि दिराला एका टोळक्याने मारहाण केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक ऋषीकेश जैस्वाल यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार करत शहागंज भागातील फळ विक्रेते व इतरांच्या अतिक्रमणावर कारवाईची मागणी केली होती.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Islam Party: औरंगजेबच्या कबरीवर डोकं टेकवत 'इस्लाम पार्टी'ची छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्ट्री! MIMला तगडं आव्हान

त्यानुसार उपायुक्त वाहुळ यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने शहागंज भागातील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवून फळ विक्रेत्यांना हुसकावून लावत रस्ते मोकळे केले. पण एमआयएमच्या नगरसेवकांवर टीका होताच पक्षाच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेत्यासह अनेक नगरसवेक दुसऱ्या दिवशी शहागंज भागात धडकले. त्यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी व अतिक्रमण हटाव पथकाला हुसकावून लावले. साजेद समीर बिल्डर यांचा दावा होता की त्यांची आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी चर्चा झाली होती.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Ajit Pawar: राज्य शासनाचा मोठा निर्णय! बारामतीतील शासकीय रुग्णालयांना अजित पवारांच नाव; असं होणार नामकरण

रस्त्यावर मार्किंग करून फळ विक्रेत्यांना परवानगी देण्याचा आणि रमजान झाल्यानंतर अतिक्रमणांचा आढावा घेऊन कारवाईचे निर्देश त्यांनी दिले होते. असे असताना कारवाई कशी करण्यात आली, उपायुक्त वाहुळ हे मनमानी कारभार करतात, असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला. त्यानंतर महापालिकेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळ निर्माण केल्या प्रकरणी एमआयएमच्या 11 नगरसेवक व त्यांच्या चार नातेवाईकांविरुद्ध विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
EVM Voting Machine : EVM अन् VVPAT मशीन कसे काम करते? मतदान यंत्रणा जाणून घ्या!

या कारवाईने एमआयएम पक्षात एकच खळबळ उडाली. एकीकडे सत्ताधारी शिवसेना-भाजपाने ही कारवाई योग्य असल्याचे म्हणत आयुक्त जी श्रीकांत यांना पाठिंबा दर्शवला होता. तर एमआयएमने कारवाई चुकीची आणि हेतुपूरस्पर केल्याचा आरोप केला. आज दिवसभराच्या राजकीय घडामोडीनंतर एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली.

Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika
Iran Vs USA, Israel War: नागपूरचे पर्यटक दुबईत अडकले! चिकटे अन् घारफेंडे कुटुंबातील 9 जणांची महाराष्ट्र सरकारकडं याचना; काय आहे परिस्थिती?

वस्तुस्थिती सांगत कायद्याने कारवाईला आमचा विरोध नाही. परंतू सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या दबावातून विशिष्ट समाजाला टार्गेट केले जाऊ नये. अतिक्रमणांवर कारवाई करायचीच असेल तर ती शहराच्या सर्वच भागात आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांनी केलेल्या अतिक्रमणावर केली जावी, अशी भूमिका एमआयएमच्या वतीने मांडण्यात आली. यावर आयुक्तांनीही महापालिका प्रशासन कोणाच्याही दबावात काम करत नाही, करणार नाही. कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई केलीच जाईल, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com