Ambadas Danve News : 'हिबानामा' प्रकरणातील आरोपावरून भुमरेंच्या चालकाची अंबादास दानवे यांना मानहानीची नोटीस!

land compensation controversy News : खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांच्यावर 'हिबानामा' आधारे 23 एकर शेतजमीनीचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता.
Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.
Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांच्यावर 'हिबानामा' आधारे 23 एकर शेतजमीनीचा मोबदला लाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला होता. या मागे खासदार संदीपान भुमरे यांची राजकीय पाठबळ असल्याचा आरोपही दानवे यांनी दोन दिवसापुर्वी केला होता.

यावर संदीपान भुमरे यांनी पत्रकार परिषद घेत अंबादास दानवे यांचे आरोप फेटाळले होते. माझा ड्रायव्हर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही भुमरे यांनी सांगितले होते. शिवाय आपणही स्वतंत्रपणे मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.
BJP leader death : अकाली एक्झिट! महिनाभरापूर्वी पदभार, आज काळाचा घाला; भाजप नेत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर आता भुमरे यांचे चालक जावेद रसूल शेख यांनी अंबादास दानवे यांना एक कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे. संबंधित नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप व विधाने बिनशर्त मागे घ्यावीत, अन्यथा फौजदारी व दिवाणी स्वरुपाची पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.
Shivsena News : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची दबंगगिरी; गाडीची तोडफोड, पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल

दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्या नावाचा उपयोग करून जावेद शेख यांनी मौजे जटवाडा/जोगवाडा येथील गट क्रमांक 174 (जुना सर्व्हे क्रमांक 89) या जमिनीच्या हिबानामाद्वारे तब्बल 1150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.
Ashok Chavan on NCP : नांदेड महापालिकेत कसेबसे खाते उघडलेल्या राष्ट्रवादीला अशोक चव्हाणांचा खोचक टोला,'घड्याळ आता हळूहळू..!'

मात्र, जावेद शेख यांच्या वतीने पाठवलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे की, संबंधित गट क्रमांकाची मालमत्ता प्रत्यक्षात अस्तित्वात नसून कोणतीही शहानिशा न करता केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या हेतूने खोटे व दिशाभूल करणारे विधान करण्यात आले. या विधानांमुळे खासदार संदीपान भुमरे (Sandippan Bhumre) तसेच जावेद शेख यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्याचा दावा करण्यात आला आहे.

Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.
congress Vs bjp :'भाजपची शेवटची फडफड, त्यांचा शेवट जवळ आलाय'; काँग्रेस उपमुख्यमंत्र्याची जळजळीत टीका

माध्यमांसमोर केलेल्या आरोपांमुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसला असून मानसिक त्रासही सहन करावा लागला आहे. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागण्यात आली आहे. त्यासोबतच ठरावीक मुदतीत स्पष्टीकरण न दिल्यास न्यायालयात दावा दाखल करून पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Ambadas Danve addresses media, questioning Sandipan Bhumare over alleged irregularities in the 23-acre Hibanama land case linked to Jatwada-Jogwada area.
BJP Politics : भाजप नगरसेवकांना बंडखोरी भोवणार, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी उचलले मोठं पाऊल, भिवंडी प्रकरणाची गंभीर दखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com