Shivsena News : शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखांची दबंगगिरी; गाडीची तोडफोड, पिता-पुत्राविरोधात गुन्हा दाखल

Solapur Shivsena : बेगम पेठ पोलिस चौकीजवळ उभी असलेल्या कारची तोडफोड झाल्याचा आरोप मुश्ताक महिबूब शेख आणि त्यांच्या मुलावर. अतिक्रमण तक्रारींच्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना सोलापुरात चर्चेचा विषय ठरली.
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 February : शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख मुश्ताक महिबूब शेख यांची दबंगगिरी पुढे आली आहे. बेगम पेठ पोलिस चौकीच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या कारची तोडफोड शेख आणि त्याचा मुलगा जैद शेख यांनी केली आहे. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील अतिक्रमणाबाबत तक्रारी झाली होती. त्यातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गाडीच्या तोडफोडप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्यात मुश्‍ताक महिबूब शेख आणि जैद मुश्‍ताक शेक (बेगम पेठ) या बाप लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अफसर हुसेनबाशा शेख (रा. बेगम पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे सोलापूर शहरात (Solapur) एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादीनुसार, अफसर शेख यांनी त्यांच्या घरासमोर कार (एम एच १३, ईएस ८८८६) लावली होती. शेजारीच कार्यालय असल्याने शिवसेनेचा (Shivsena) पदाधिकारी मुश्‍ताक हा तेथे आला. कार तेथे का लावली, अशी विचारणा करत मुश्‍ताक याने त्याच्या जवळील पलंग ओढल्याने कारवर ओरखडे पडले.

Shivsena
Maharashtra Rajya Sabha election : राज्यसभेसाठी एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने डाव टाकणार? आघाडीत बिघाडी झाल्यास 2022 ची पुनरावृती होणार? 'ही' नावे चर्चेत

मुश्ताक शेख याने कार्यालयातून आणलेल्या सळईने कारच्या मागच्या आणि पुढच्या काचा फोडल्या. त्यात कारचे ८० ते ९० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच, सळईने अफसर यांच्या पायावरही मारहाण केली. त्यात त्यांना दुखापत झाली आहे. जैद याने त्यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. त्यांचा मुलगा साकिब यालाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

Shivsena
Beed News : बीडला 'मुंडें'च्या हाती लागू न देण्यासाठी धस-क्षीरसागरांची धावपळ : थेट CM फडणवीसांची घेतली भेट; धनंजय देशमुखांनाही घेतलं सोबत

दरम्यान, शिंदेसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख मुश्ताक शेख याचे या परिसरात कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत. नागरिक आणि शेख यांच्यात मंगळवारी वादही झाला होता. या कार्यालयाच्या पाठीमागे राहणारे अफसर शेख यांनी पोलिस चौकीच्या पाठीमागे आपली नवीन गाडी उभी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com