Chhatrapati Sambhajinagar Constituency : अखेर छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनाच देणार उमेदवार; 'या' नावाची होणार घोषणा!

Loksabha Election 2024 : कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरची जागा सोडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे भाजपचा नाइलाज.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Chhatrapati Sambhajinagar : महायुतीतील शिवसेना पक्षाचे पहिल्या यादीत जाहीर झालेल्या काही जणांची उमेदवारी बदलण्यात आली आहे. हिंगोली, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात हे बदल झाल्यानंतर शिवसेनेत खळबळ उडाली आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा उमेदवार अखेर ठरला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी या पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले. परंतु महायुतीकडून संभाजीनगरात कोण लढणार? हे स्पष्ट होत नव्हते.

अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रिलायक माहिती आहे. आज सायंकाळी किंवा उद्या भुमरे(Sandipan Bhumre) यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील आठपैकी हिंगोली आणि वाशीम-यवतमाळ मतदारसंघातील अनुक्रमे हेमंत पाटील, भावना गवळी यांची उमेदवारी बदलण्यात आली आहे. यावरून शिवसेना शिंदे गटात कमालीची नाराजी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhatrapati Sambhajinagar
Panjabrao Dakh News : आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक; परभणीतील ‘वंचित’चा उमेदवार बदलला; पंजाबराव डख यांना उमेदवारी

भाजपच्या दबावामुळे या दोघांच्या उमेदवाऱ्या कापण्यात आल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. कुठल्याही परिस्थितीत संभाजीनगरची(Chhatrapati Sambhajinagar Constituency) जागा सोडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे भाजपचा नाइलाज झाला. जाहीर केलेल्या दोन उमेदवाऱ्या बदलल्यानंतर भाजपनेही संभाजीनगरबाबतीत मवाळ भूमिका घेत ही जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगोली-यवतमाळ-वाशीमच्या उमेदवार बदलासाठी काल मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पहाटे तीनपर्यंत खलबते सुरू होती. त्याचबरोबत जागावाटपात ज्या जांगावरून वाद आहेत, त्यावरही शेवटचा घाव घालण्यात आल्याची माहिती आहे. याच बैठकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनाच लढणार हे निश्चित झाले आणि संदीपान भुमरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भुमरे यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला असून, आज रात्री किंवा उद्या शिवसेनेच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर केले जाणार आहे.

महायुती सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. त्याचा राजकीय लाभ लोकसभा निवडणुकीत मिळावा, यासाठी संभाजीनगरमधून मराठा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. संदीपान भुमरे हे पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून आलेले आहेत. त्यांचा हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येत असला तरी भुमरे यांची संभाजीनगरात पालकमंत्री म्हणून मोठा जनसंपर्क आहे.

Chhatrapati Sambhajinagar
Nanded BJP V/s Congress : अशोक चव्हाण हे चिखलीकरांसाठी बूस्टर डोस; फडणवीस नेमके काय म्हणाले?

जिल्ह्यातही भुमरे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने लोकसभेच्या उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असताना मुख्यमंत्र्यांनी भुमरे यांच्या नावाला पसंती दिल्याचे सांगितले जाते. भुमरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलेले विनोद पाटील माघार घेऊ शकतात. मुख्यमंत्र्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे भुमरेंच्या विरोधात ते अपक्ष लढणार नाहीत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com