BJP news : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील पारदर्शक कारभारावर भाजपच्या माजी आमदाराकडून प्रश्नचिन्ह?

Political News : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते, पण तसे होताना दिसत नाही.
Sanjay Kenekar
Sanjay KenekarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhaji Nagar municipal corporation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील भ्रष्टाचार थांबवून पारदर्शक कारभाराचे आश्‍वासन जनतेला दिले आहे, पण अधिकारी, ठेकेदार, पीएमसी अशी भ्रष्टाचाराची साखळी महापालिकेत कार्यरत आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केली.

महापालिका आयुक्त कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी चौकशी केली नाही तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल, असा इशाराही केनेकर यांनी यावेळी दिला. माजी आमदार केनेकर यांनी सोमवारी आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

Sanjay Kenekar
BMC commissioner : BMC आयुक्तपदासाठी 7 ज्येष्ठ IAS अधिकाऱ्यांची फिल्डिंग : 80 हजार कोटी 'बजेटची' चावी कोणाच्या हाती जाणार?

शहराच्या औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यामुळे सुमारे दीड लाख कुटुंब नव्याने शहरात येण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने पायाभूत सुविधांत आपण कुठे आहोत, याचा विचार आत्तापासूनच करावा लागणार आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारमुक्त महापालिका करण्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते, पण तसे होताना दिसत नाही.

Sanjay Kenekar
Prashant Bamb News: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेनंतर आमदार प्रशांत बंब यांनी वळवला पुन्हा महापालिकेकडे मोर्चा

पाणी पुरवठा व जलनिस्सारण योजनेतील यश इनोव्हेटिव्ह या पीएमसीमुळे झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल. आयुक्त कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप यावेळी केनेकर यांनी दिला. दरम्यान त्यांनी महापौर समीर राजूरकर यांची भेट घेऊन त्यांना देखील यासंदर्भात निवेदन दिले.

Sanjay Kenekar
Sanjay Shirsat : शिवसेनेच्या मेळाव्यात चक्क MIM अन् भाजपच्या कामांचे कौतुक; शिंदेंचा नेता म्हणाला, "तरच आपण राजकारणात टिकू..."

आमदार बंबनंतर आता केनेकर

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर, स्थायी समिती सभापती अशी महत्वाची पदे भाजपकडे आहेत, असे असताना भ्रष्टाचाराचे आरोप कायम आहेत. काही दिवसांपूर्वी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महापालिकेत येऊन प्रशासकीय कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता माजी आमदार संजय केनेकर यांनी बंब यांच्या भूमिकेची पुनरावृत्ती केली आहे. बंब यांनी मागणी केल्यानुसार चौकशी झाली पाहिजे, असेही केनेकर यावेळी म्हणाले.

Sanjay Kenekar
Sanjay Shirsat : शिवसेनेच्या मेळाव्यात चक्क MIM अन् भाजपच्या कामांचे कौतुक; शिंदेंचा नेता म्हणाला, "तरच आपण राजकारणात टिकू..."

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच काम सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या भ्रष्टाचारमुक्त महापालिका या मंत्रानुसार काम सुरू आहे. महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणली जात आहे. संजय केनेकर यांनी दिलेल्या पत्रानुसार पाणी योजनेचे काम जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. त्यावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करते. त्यामुळे हे पत्र विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येईल, असे महापौर समीर राजूरकर यांनी केणेकर यांच्या निवेदनावर सांगितले.

Sanjay Kenekar
Ambadas Danve : घोषणांचा सुकाळ अन् कामाचा दुष्काळ; ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेतील भाजपाच्या कारभाराचा पंचनामा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com