Sanjay Shirsat : सत्तारांचे कौतुक करणाऱ्या प्रतापसिंह पाटलांना मंत्री शिरसाटांचा सल्ला; म्हणाले, आमच्यात मतभेद...

Marathwada Graduate Constituency: प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचे श्रेय अब्दुल सत्तार यांना दिल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. आमदारकी उपभोगा, जनतेची कामे करा आणि मतभेद टाळा, असा सल्ला त्यांनी दिला.
Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena Politics News : "मराठवाडा पदवीधर मतदारसंघात तुम्ही मोठा विजय मिळवला आहे. आमदार झाला आहात, ती आमदारकी उपभोगा आणि जनतेची कामे करा. उगाच आमच्यात मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न करू नका", असा सल्ला शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नवनिर्वाचित आमदार प्रतापसिंह पाटील यांना दिला. दोन दिवसापुर्वी प्रतापसिंह पाटील यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचे तोंडभरून कौतुक केले होते. आपल्या विजयाचे श्रेय देताना तेच खरे कॅप्टन होते, पहिल्या चेंडूवर त्यांनी ही मॅच आम्हाला जिंकून दिली, अशा शब्दात सत्तारांचे गुणगान केले होते.

शिवसेनेत असलेल्या मतभेदामुळे अब्दुल सत्तार यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी महाविकास आघाडीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना उघड पाठिंबा जाहीर करत त्यांच्यासाठी प्रचारही केला. पक्षाच्या विरोधात ही भूमिका घेताना सत्तार यांनी संजय शिरसाट यांच्यावरही टीका केली होती. "आमच्या पालकमंत्र्यांनी सुरवातीला महायुतीच्या सतीश चव्हाण यांना शिवसेनेचा पाठिंबा नाही, असे जाहीर केले होते. त्यांच्याच आदेशाचे पालन आम्ही केले. नंतर त्यांनी भूमिका का बदलली? मला पक्षाकडून कुठलाही निरोप मिळाला नव्हता".

"आम्ही वारंवार भूमिका बदलली, तर आम्हाला लोक जोड्याने मारतील", अशा शब्दात सत्तार यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला होता.दरम्यान, प्रतापसिंह पाटील यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर त्यांना मदत करणाऱ्या राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. दोन दिवसापूर्वी सिल्लोड मतदासंघात पाटील यांनी अब्दुल सत्तार यांची भेट घेत त्यांचा सत्कार स्वीकारला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय अब्दुल सत्तार यांना दिले.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक करायचाय? घरबसल्या करा अपडेट; पाहा सोपी ऑनलाइन प्रक्रिया!

यावर संजय शिरसाट यांना माध्यमांनी विचारले असता, "निवडणुकीत मदत करणाऱ्यांचे आभार नुकतेच आमदार झालेले प्रतापसिंह पाटील मानत आहेत, विजयाचे श्रेय ते जर कोणाला देत असतील, तर तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. परंतु आता ते आमदार झाले आहेत, त्यांनी ती आमदारकी भोगावी, लोकांची कामे करावीत. आमच्यात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये", असा सल्ला शिरसाट यांनी प्रतापसिंह पाटील यांना दिला.

Abdul Sattar-Sanjay Shirsat-Eknath Shinde
Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत निलंगेकरांना हवे परिवर्तन, तर देशमुखांना राखायची सहकारावर पकड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.