Gokul Court Case : सतेज पाटलांचा मोर्चा सुरू असतानाच कोर्टात सुनावणी, वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, 'सरकारचा निर्णय...'

Satej Patil Vs Mahayuti : अध्यादेशाच्या माध्यमातून गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शासन नियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार दिल्याचा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला आहे.
Gokul chairman Election
Gokul chairman ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gokul News : सतेज पाटलांनी कोल्हापूरमध्ये संघर्ष मोर्चा काढला आहे. हा मोर्चा निघाला असतानाच औरंगाबाद खंडपीठात गोकुळसंदर्भात सुनावणी सुरू आहे. समविचार आघाडीकडून अ‍ॅड. अभिषेक सिंघवी हे बाजू मांडत आहेत.

सरकारने सहकारी संस्थावर शासकीय संचालक नियुक्तीचा आणि त्यांचा मतदानाचा काढलेले आदेश पूर्णतः कायद्याच्या विरोधात आहे, असंवैधानिक आहे. त्यांचा उद्देश मुळात चूक आहे, असे युक्तावाद सिंघवी यांनी केला.

ते म्हणाले, अध्यक्ष निवडणूक जुन्या पद्धतीने व्हायला हवी सरकारचा आताचा निर्णय असा लागू करता येणार नाही. सरकारच्या आदेशाने ताकतीने बहुमत तयार करण्याचा प्रयत्न केला.

सरकारने आदेश काढण्याचे एक कारण सांगावे हा अध्यादेश पास करण्याचे फक्त एक कारण आहे. स्वतः निर्माण केलेले परिस्थिती या अध्यादेशासाठी साठी वापरली आणि या माध्यमातून सहकार क्षेत्र सोबत खेळण्यात आले, असे देखील त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले.

सरकारडून युक्तिवाद

सरकारकडून युक्तिवाद करताना अ‍ॅड. मुकूल रोहतगी यांनी यांनी सरकारच्या आदेशाचे समर्थन केले. त्यांनी युक्तावादात सांगितले की, हा अध्यादेश समाजाहिताच्या दृष्टिने महत्त्वाचा आहे. फक्त एका सोसायटीसाठी हा कायदाआहे, असे म्हणणे चुकीचे आहे. अशा चार संस्था आहेत. सरकारने या संस्थाना नाममात्र किंमतीत जमीन दिली आहे.

Gokul chairman Election
Satej Patil Aggressive : सतेज पाटील थेट CM फडणवीसांना भिडले, 'त्या' दाव्यावर सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, 'कायदा...'

मोर्चाला प्रचंड प्रतिसाद

सतेज पाटील यांनी काढलेल्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक यामध्ये सहभाहगी झाले आहेत. महायुतीच सरकारचा निषेध या मोर्चातून करण्यात आला आहे. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढलेल्या या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले आहेत. शेतकरी नेते राजू शेट्टी, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री जयंत पाटील या मोर्चात सहभागी झाले आहेत.

Gokul chairman Election
Satej Patil: "लक्षात ठेवा! कोल्हापूर स्वाभिमानी, अहंकाराची मस्ती उतरवतंच"; अध्यादेश लागू झाल्यानं सतेज पाटील आक्रमक, केली मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.