Koregaon Politic's : शंभूराज देसाई 11 दिवसांत दुसऱ्यांदा कोरेगावात; राजाभाऊ बर्गेंना ताकद देत महेश शिंदेंना सुनावले

Shambhuraj Desai Vs Mahesh Shinde : साताऱ्यात महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. कोरेगाव दौऱ्यात देसाई यांनी राजाभाऊ बर्गे यांना पाठिंबा देत शिंदेंना फटकारले.
Shambhuraj Desai-Mahesh Shinde
Shambhuraj Desai-Mahesh Shinde sarkarnama
Published on
Updated on

Satara, 02 May : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून आमदार महेश शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पालकमंत्री देसाई यांनी 11 दिवसांत कोरेगावचा दुसऱ्यांदा दौरा केला आहे. या दौऱ्यात आमदार शिंदे यांचे विरोधक कोरेगावचे पहिले नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांना ताकद देत स्वपक्षाच्या आमदाराला चांगलेच फटकारले आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी भाजपला मदत केल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी आमदार महेश शिंदे यांना पर्याय शोधण्याची चाचपणी करत कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. बर्गेंच्या प्रवेशासाठी खुद्द पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आले होते.

शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 20 एप्रिल रोजी कोरेगावातील अंगापूर येथे नेऊन पक्षातील आपली ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर एक मे रोजी शंभूराज देसाई हे पुन्हा एकदा कोरेगावच्या दौऱ्यावर गेले होते. पण एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांच्या दौऱ्यावेळी आमदार शिंदे हे अनुपस्थित राहिले.

शिवसेना शाखा आणि राजाभाऊ बर्गे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी पालकमंत्री देसाई यांनी महाराष्ट्र दिनी कोरेगावात हजेरी लावली. त्या कार्यक्रमास आमदार महेश शिंदे यांनी पुन्हा दांडी मारत आपण वाकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Shambhuraj Desai-Mahesh Shinde
Mahesh Shinde : आमदार महेश शिंदेंबाबत शिवसेनेच्या बड्या नेत्याचे मोठे संकेत : ‘पुढच्या आठवड्यात...काही कटू निर्णयही...’

याबाबत शंभूराज देसाई म्हणाले, कोरेगावचा छोटा दौरा झाला आहे, मोठा अजून व्हायचा आहे. शिवसेना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा मेळावा लवकरच कोरेगावमध्ये घेणार आहोत. राजाभाऊ बर्गे यांनी आज (ता. 02 मे) खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवला आहे, त्याचेच त्यांनी मला निमंत्रण दिले होते. पण पाटण मतदारसंघात खूप कार्यक्रम आणि लग्न असल्यामुळे मी आज कोरेगावच्या दौऱ्यावर आला होतो.

राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेना प्रवेशाचा घेतलेला निर्णय लोकांना रुचला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी राजाभाऊ बर्गे यांच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी करण्याचा शब्द दिला आहे. बर्गे हे शिवसेना वाढीचे काम करत आहेत, त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

विद्यमान आमदार कार्यक्रमाला उपस्थित जाणवत आहे, असा प्रश्न पत्रकार विचारत असतानाच शंभूराज देसाई यांनी त्यांचे म्हणणे मध्येच तोडत ‘जाऊ द्या हो, चांगले कार्यक्रम चाललेत आणि काय? ’ असे विधान केले. मात्र बरं विचारा म्हणत त्यावर उत्तर दिले. शेजारी उभे असलेले एका नेत्याला तुमच्या जुन्या मित्राचे विचारतात, असे म्हणत कोटी केली.

Shambhuraj Desai-Mahesh Shinde
Satara ZP Update : राष्ट्रवादीच्या बंडखोर सदस्यांना दिलासा : म्हणणं मांडण्यास मुदतवाढ; पण ‘ती’ महत्वपूर्ण मागणी फेटाळली...

शिवसेना शाखा आणि संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन आहे. जिथं शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह असते तिथं कोणत्याही नेत्याला, उपनेत्याला, संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार, मंत्र्यांना निमंत्रण देण्याची पद्धत शिवसेनेत नाही. पक्षाचा कार्यक्रम म्हटलं की सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनची पद्धत आहे. त्यामुळे महेश शिंदेंना बोलावलं, नाही बोलावलं, हा विषय महत्वाचा नाही. हा पक्षाचा कार्यक्रम असून आम्ही पक्षवाढीचे काम करत आहोत, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com