Babajani Durani News: शिवसेनेच्या नगराध्यक्षाचा काँग्रेसच्या बाबाजानी दुर्राणींना दणका, गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत दोन सभांसाठी केले निलंबित

Pathari NagarPalika: महाराष्ट्र नगर पालिका (कामकाज चालविणे) नियम 1966 नुसार प्रस्ताव मांडण्याची निश्चित प्रक्रिया असताना त्यांनी त्याचे पालन न करता अध्यक्षांची परवानगी न घेता आक्रमक पद्धतीने चर्चा केल्याचे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
Babajani Durrani
Citizens gather outside Pathri Municipal office watching the live streaming of the council meeting on a large LED screen, promoting transparency in governance.Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : पाथरी नगरपालिकेत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा राजकारणानं आता गंभीर वळण घेतले आहे. काँग्रेसचे स्वीकृत सदस्य तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या सातत्याने विकासकामात खोडा घालण्याच्या प्रकाराला वैतागलेल्या नगराध्यक्षांनी बाबाजानी दुर्राणी यांच्यावर सर्वसाधारण सभेत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत दोन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपालिकेचा कारभार पारदर्शक असावा, सभागृहात विकास कामात कोण अडथळा आणतो, कोण सहकार्य करतो? हे पाथरीच्या जनतेला कळावे यासाठी सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय नव्या सत्ताधाऱ्यांनी घेतला होता. परंतु कुरघोडीच्या राजकारणाचे हिडीस प्रदर्शन पहिल्याच सभेत पाथरीकरांना लाईव्ह पहायला मिळाले.

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत स्वीकृत सदस्य बाबाजानी दुर्राणी यांना आगामी दोन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित केल्याची नोटीस नगराध्यक्ष आसेफ खान यांनी सोमवारी बजावली.

आपणास सदस्य पदावरून अपात्र का करू नये? याची विचारणाही याद्वारे करण्यात आली आहे. संबंधित नोटीसमध्ये शुक्रवार 20 मार्च रोजीच्या नोटीसनुसार 27 मार्च रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत दुर्राणी हे विषयपत्रिकेबाहेरील मुद्द्यांवर वारंवार बोलत होते.

Babajani Durrani
Bharat Gogawale : मंत्री भरत गोगावलेंच्या रिटायरमेंटचे संकेत; मुलानेच दिली अपडेट, 'ती' इच्छा अपूर्णच?

महाराष्ट्र नगरपालिका (कामकाज चालविणे) नियम 1966 नुसार प्रस्ताव मांडण्याची निश्चित प्रक्रिया असताना त्यांनी त्याचे पालन न करता अध्यक्षांची परवानगी न घेता आक्रमक पद्धतीने चर्चा केल्याचे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सभेत मोठ्याने आवाज करणे, हातवारे करून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे, अरेरावीची भाषा वापरणे तसेच मतदानाचा अधिकार नसतानाही त्यांनी मतदान घेणेसाठी ओरडणे अशा प्रकारे गोंधळ निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Babajani Durrani
Chandigarh Bomb Blast: मोठी बातमी: भाजप कार्यालयाबाहेर बॉम्ब स्फोट; पोलिस पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल,घातपात की...?

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. सभा संपल्यानंतरही दुर्राणी व त्यांच्या गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या वतीने काम पाहणारे अशोक वाघुंबरे व सभा अधीक्षक स्वामी यांच्याशी सभागृहातच सुमारे अर्धा तास वाद घालत दमदाटी केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे सभागृहाची प्रतिमा मलिन झाली असून अधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोबल खच्चीकरण झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्याला असलेले अधिकार विसरून कामकाजात गोंधळ घातल्याच्या पार्श्वभूमीवर बाबाजानी दुर्राणी यांना महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 च्या कलम 42 (03) अंतर्गत नोटीस देऊन आपणास सदस्य पदावरून अपात्र का करू नये? याचा खुलासा दहा दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पाथरी नगर परिषदेतील राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com