Mahayuti dispute : "सहा महिन्यांत सत्ता उलथवून टाकू"; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

Dharashiv Zilla Parishad Politics : "कुठलीही गोष्ट लादून घ्यायची नाही. आपण वेठबिगार नाही. आपल्या जीवावर सत्ता आलेली आहे. सत्ता फक्त तुमची नाही, आमचीही आहे. मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवू नका. वेठबिगार आणि गुलाम समजून काम सांगितले, तर काम करू नका, निषेध नोंदवा."
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Dharashiv News, 30 Oct : पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणुकीत शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. दोन्ही पक्षांमधील हा वाद सुरू असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना थेट इशारा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत तानाजी सावंत यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना वेठबिगार समजून वागणूक दिली, तर सहा महिन्यांत सत्ताच उलथवून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि अर्चना पाटील यांच्यावरही निशाणा साधला.

Tanaji Sawant
ZP Headmasters: झेडपी मुख्याध्यापकांसाठी मोठी खुशखबर! सुटीत काम केल्यास दरवर्षी मिळणार 15 दिवसांची अर्जित रजा; पण एक अट!

जिल्हा परिषद सदस्यांशी संवाद साधताना सावंत म्हणाले, "कुठलीही गोष्ट लादून घ्यायची नाही. आपण वेठबिगार नाही. आपल्या जीवावर सत्ता आलेली आहे. सत्ता फक्त तुमची नाही, आमचीही आहे. मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने सत्ता चालवू नका. वेठबिगार आणि गुलाम समजून काम सांगितले, तर काम करू नका, निषेध नोंदवा."

तसेच, सत्तेचा माज आम्ही खपवून घेणार नाही. शिवसेनेच्या सदस्यांना वेठबिगार समजाल, तर सहा महिन्यांत सत्ता उलथवून टाकू, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

Tanaji Sawant
Nilesh Rane : निलेश राणेंनी नवनाथ बन यांची लायकी काढली, धंगेकरांनीही पगारी पत्रकार म्हणत चिडवले; भाजप प्रत्युत्तर देणार?

राज्याच्या राजकारणात महायुतीमधील दोन्ही पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता जिल्हा पातळीवरही मतभेद समोर येत आहेत. तानाजी सावंत यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे धाराशिवमधील महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा टाकण्यासाठी दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.