BJP Controversy : "मदरशांवर बुलडोजर चालवाच!" भाजप नेत्याचा वादग्रस्त वक्तव्य; नितेश राणेंचं उघड समर्थन

BJP leader T Raja Madrasa controversy : तेलंगणातील बड्या भाजप नेत्याने नांदेडमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं असून त्यांनी मंत्री नितेश राणे यांचे मदरशांवर केलेल्या विधानाचे समर्थनही केले आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
BJP leader Nitesh Rane Madrasa controversy
BJP leader Nitesh Rane Madrasa controversy sarkarnama
Published on
Updated on
Summary
  • तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांनी नांदेडमध्ये मदरशांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले.

  • अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची भूमिका त्यांनी मांडली आणि नितेश राणे यांना पाठिंबा दिला.

  • पोलिसांनी या भाषणाची दखल घेतली असून प्रकरणामुळे राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Nanded News : आक्रमक भाषणासाठी आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या भाजप नेते मंत्री नितेश राणे यांचे समर्थन तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांनी केलं आहे. काहीच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये नमाज पठणाच्या वादावर भाष्य करताना नितेश राणे यांनी थेट राज्यातील मदरशांना टार्गेट केलं होतं. तसेच भारतात धर्मनिरपेक्ष नावाची कोणतीही गोष्ट नाही असे म्हणत मदरशात शिक्षण घेऊन कुणी डॉक्टर किंवा इंजिनिअर झालं का? असा सवाल केला होता.

तसेच मदरसे हे दहशतवाद्यांचे अड्डे असून मुख्यमंत्र्यांना भेटून सर्व मदरसे बंद करायला सांगणार असल्याचं मोठं वक्तव्य केलं होते. ज्यानंतर या वक्तव्यावरून राज्यात वादाला तोंड फुटले होते. तसेच मदरशांबाबत राणेंनी केलेल्या वक्तव्यावर भाजपची काय भूमिका आहे? असा सावल विरोधकांनी उपस्थित केला होता.

आता पुन्हा एकदा राज्यातील मदरशांना टार्गेट करण्यात आलं असून तेलंगणातील आमदार टी. राजा सिंह यांनी यावरून भाष्य केलं आहे. त्यांनी राज्यातील मदरशांवर बुलडोझर चालवण्याची भूमिका घेतली आहे. तसेच नितेश राणे यांच्या मदरसे बंद करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे म्हटलं आहे. यामुळेच वाद उद्भवण्याची शक्यता असून टी राजा यांच्या विधानाविरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

BJP leader Nitesh Rane Madrasa controversy
BJP Politics : 'कार्यकर्ता आमच्यासाठी महत्वाचा' म्हणत आमदार केनेकर यांनी स्वीकृतबाबत घेतला मोठा निर्णय, 'चिरंजवीचा अर्ज...'

टी. राजा यांनी नांदेडमध्ये काल रात्री झालेल्या सभेत मदरशांबाबात विधान केले होते. ज्यानंतर याची दखल बिलोली पोलिसांनी घेतली. टी. राजा यांनी राज्यातील अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याचे विधान करत नितेश राणे यांच्या अनधिकृत मदरसे बंद करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील सगळे मदरसे बंद करा, अशी मागणी त्यांनी केली.

टी. राजा यांनी मदरशांमध्ये देश विघातक शिक्षण दिले जात असून ते बंद केले पाहिजेत, तर जे अनधिकृत मदरसे आहेत त्यावर बुलडोझर चालवण्याची गरज आहे. बुलडोझर चालवून ते उद्ध्वस्त केले पाहिजेत. तर दाऊद इब्राहिम आणि अजमल कसाब सारखे अशाच मदरशातून तयार झाले असाही दावा टी. राजा यांनी केला.

तर अशा मदरशांमध्येच हिंदूंची हत्या करा असे शिकवले जात असल्याचाही आरोप टी. राजा यांनी यावेळी केला. तर नितेश राणे यांच्या मदरशांबाबत भूमिकेला आपला पाठिंबा असून त्यांना आपली विनंती आहे की ते जे बोलले त्याची त्यांनी अंमलबजावणी करावी.

दरम्यान आता टी राजा यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात संपात व्यक्त केला जात असून मोठी खळबळ उडाली आहे. तसेच येथील बिलोली पोलीस ठाण्यात टी राजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नोटीस बजावली आहे.

या नोटीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे बिलोली येथे सभा घेण्यास अटी व शर्तींवर परवानगी देण्यात आली होती. मात्र टी राजा यांनी शांतता, धार्मिक सौहार्दाचे उल्लंघन केले असे नोटीसमध्ये म्हटले असून पोलीस ठाण्यात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

BJP leader Nitesh Rane Madrasa controversy
BJP Politics : भाजपच्या माजी महिला खासदाराने ठाकरेंना डिवचलच, राऊतांना पोपटही म्हणाल्या; 'सकाळचा भोंगा, धंदे...'

FAQs :

1. टी. राजा सिंह यांनी काय वक्तव्य केले?
त्यांनी नांदेडमधील सभेत अनधिकृत मदरशांवर बुलडोझर चालवण्याची मागणी केली.

2. हे वक्तव्य वादग्रस्त का ठरले?
धार्मिक विषयावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

3. पोलिसांनी काय कारवाई केली?
पोलिसांनी या भाषणाची दखल घेतली असून पुढील तपास केला जाऊ शकतो.

4. नितेश राणे यांचा यात काय संबंध?
राजा सिंह यांनी नितेश राणे यांच्या मदरसे बंद करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय वाद वाढू शकतो आणि कायदेशीर कारवाईची शक्यता देखील निर्माण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com