
Dharashiv News : मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मस्साजोगच्या या घटनेची दहशत कायम असतानाच दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळजापूर तालुक्यामध्ये ही बीडच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री करण्यात आला. तीन दिवस उलटले तरी या घटनेतील आरोपी फरार आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी ( ता. 26) रात्री करण्यात आला होता. सरपंच नामदेव निकम हे भावासह गाडीत बसले असताना त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणातील आरोपी देखील फरार आहेत. आरोपींचा शोध घ्यावा यासाठी सरपंचासह गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे पोलिसांविरोधात गावकऱ्यांचा संताप आहे. मात्र, दुसरीकडे आंदोलनस्थळी आलेल्या पोलिसांची गाडी सुरू होईना, त्यामुळे गावकऱ्यांना गाडीला धक्का मारण्याची वेळ आली होती.
तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणाऱ्या नामदेव निकम जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक हा प्रकार घडला आहे. नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. गुरुवारी रात्री काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. नामदेव निकम हे बारुळ गावातून आपल्या मेसाई जवळगा गावाच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला.
नामदेव निकम हे आपल्या चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी काही गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावले. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला.
प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि गुन्हेगारांना कधी पकडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.