Uddhav Thackeray News Mumbai
Uddhav Thackeray News MumbaiSarkarnama

Uddhav Thackeray News : पक्षाचे नाव, चिन्ह गेले तरी ठाकरे गटाकडे ओढा, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधले शिवबंधन..

Bjp : विरोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू.

Chhatrapati Sambhajinagar : आधी शिवसेनेत मोठे बंड झाले, ४० आमदार फुटून बाहेर पडले. त्यानंतर निवडणूक आयोगाने (Shivsena) शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह देखील एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. एकापाठोपाठ एक अशी संकट येत असतांना देखील ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे.

Uddhav Thackeray News Mumbai
Eknath Shinde News : उद्धव ठाकरेंना मलिकांचा राजीनामा घ्यायचा होता, पण ते घेवू शकले नाही..

छत्रपती संभाजीनगर शहरातील शेकडो (Bjp)भाजपच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षात प्रवेश करत शिवबंधन बांधून घेतले आहे. जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेल्या या भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले.

प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका बबीता चावरिया, माजी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन झवेरी, माजी मंडळ अध्यक्ष सुधीर नाईक, माजी युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष अमित घनगाव, माजी मंडळ उपाध्यक्ष योगेश अष्टेकर, माजी युवा मोर्चा सदस्य अजय चावरिया, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे, भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद धीवर.

तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष बाबासाहेब कारले, भाजपा माजी मंडळ उपाध्यक्ष बजरंग पाटील, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन खान, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे माजी अध्यक्ष उत्तम अंभोरे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. गुरुवारी मातोश्री निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या सगळ्यांना प्रवेश देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

विरोधकांच्या विरोधात लढा अधिक बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत भविष्यात जोमाने काम करू अशी ग्वाही या पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, सागर शिंदे, रंगनाथ राठोड आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com