Uddhav Thackeray statement: दोन कुबड्या फेकण्याची हिंमत राज्य सरकार दाखवणार का? उद्धव ठाकरेंचा घणाघाती सवाल

Uddhav Thackeray attack on state govt News : राज्यातील महायुती सरकारकडे दोन कुबड्या फेकण्याची हिंमत नसल्याची जोरदार टीका त्यांनी केली.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Jalana News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चार दिवसीय मराठवाडा दौऱ्याची शनिवारी सांगता झाली. यावेळी जालन्यातून उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यातील महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने फसवे आश्वासन देत आहे. मात्र, राज्यातील महायुती सरकारकडे दोन कुबड्या फेकण्याची हिंमत नसल्याची जोरदार टीका त्यांनी केली. त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांनी मदत मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला व्होटबंदी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. पंचनामे अजूनही झाले नाहीत. पीकविमा ही शेतकऱ्यांची थट्टाच झाली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठा नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. केंद्र सरकारचे पथक कधी आले कधी गेले कळलेच नाही, त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने अडचणीत आला आहे. कर्जमुक्ती व हेक्टरी ५० हजार मिळाला पाहिजे, अशीही मागणी ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

Uddhav Thackeray
BJP Politic's : मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्याची सूत्रे भाजप निष्ठावंताकडे; परिचारक, क्षीरसागर, बाळराजेंकडेही महत्वाची धुरा!

मराठवाड्यातील नुकसान झालेल्या भागाची गेल्या चर दिवसात पाहणी केली आहे. नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, अद्याप पंचनाम्याचे काम पूर्ण झालेले नाही. दगाबाज शेतकऱ्यांचा पंचनामा करा. कार्यालयात जाऊन बसा, यादी तयार झाली की नाही ते पहा. पंचनामा करताना आता सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्याला लवकर मदत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्याने जागरूक राहण्यास हवे, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Sharad Pawar : पार्थ पवार प्रकरणाची चौकशी करा, कुटुंब वेगळं राजकारण वेगळं : शरद पवार 2 दिवसांच्या आरोपांनंतर पहिल्यांदा बोलले

राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या काय कळणार आहेत. मुख्यमंत्री शेतकऱ्यांची थट्टा करीत आहेत. मदत मिळाली पाहिजे यासाठीच मी आलो असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray
Ajit Pawar NCP Nagpur : फक्त एक नगरसेवक अन् पक्षाचे दोन तुकडे; महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस किती जोर मारणार?

भाजपने (BJP) देशाची लूट थांबवली पाहिजे. शेतकऱ्यांना एक रकमी मदत मिळाली पाहिजे. त्यासोबतच भारत देशाला लुटणाऱ्याला वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार नाही. त्यासोबतच विखेंचे घोटाळे जगजाहीर आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Nagpur Congress : काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष विरुद्ध सुनील केदार वाद शिगेला : चिडलेल्या सपकाळांनी सगळी बैठकच अवैध ठरवली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com