MVA News : उदगीरच्या जागेवर काँग्रेसचा डोळा; महाविकास आघाडीत रस्सीखेच

Political News: उदगीरमध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे आमदार आहेत. त्यामुळे या जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे. त्यातच आता काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
sharad pawar | Nana Patole
sharad pawar | Nana Patolesarkarnama
Published on
Updated on

Latur News : लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात मोठा विजय मिळवला. राज्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केल्यापासून काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत 13 जागी विजय मिळवल्याने आघाडीत आम्हीच मोठा भाऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

लातूरमध्ये दोन दिवसापूर्वी मराठवाडा विभागातील नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबतच काँग्रेसच्या (Congress) मेळाव्यास काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह दिगग्ज नेतेमंडळीनी हजेरी लावली. यावेळी लातूर जिल्ह्यातील नेत्यांनी चार जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. (MVA News)

उदगीरमध्ये अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे आमदार आहेत. त्यामुळे या जागेवर शरद पवार गटाने दावा केला आहे. त्यातच आता काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत तर निलंगा व औसा येथे भाजपचे तर उदगीर व अहमदपूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसने लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा या तीन मतदारसंघासह उदगीर या मतदारसंघावर दावा केला आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

sharad pawar | Nana Patole
Bjp News : भाजपची अशीही कोंडी; विधानसभेसाठी विद्यमान आमदारांना नारळ, नव्या चेहऱ्यांना द्यावी लागणार संधी

उदगीर व जळकोट तालुक्याचा या मतदारसंघात समावेश आहे. या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल पहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुलनेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने ही जागा काँग्रेसला सॊडण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, याठिकाणी शरद पवार गटाने भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे याठिकाणी त्यांच्याकडे मातब्बर उमेदवार असल्याने त्यांनी या जागेवर दावा केला आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या दोन जागाबाबत जागावाटपाच्या बैठकीत या जागेवर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

sharad pawar | Nana Patole
Devendra Fadnavis News : फडणवीसांचा जागावाटपावरुन शिंदे, अजितदादांना इशारा; म्हणाले, 'तोफ मागितली की बंदूक मिळते...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com