

Beed News : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे केली जात आहेत. दलित, आदिवसींचा समाज घटकांचा विकास केला जात आहे. द्रोपदी मुर्मू, (Dropadi Murmu) रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांना राष्ट्रपती करुन दलित व आदिवसींचा मोदींनी सन्मानच केला. त्यामुळे विरोधक कितीही एकत्र आले तरी जनता नरेंद्र मोदींसोबत असल्याने २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेला ३५० जागा जिंकून सत्ता मिळवू, असा विश्वास रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)
दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादनासाठी करण्यासाठी बीड शहरात आलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिपाइं प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे सोबत होते. यावेळी आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची प्रशंसा केली.
रामदास आठवले म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप चुकीचा आहे. २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी संविधानावर माथा टेकून शपथ घेतली. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ८० कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४० जागा जिंकू, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. समान नागरी कायदा असावा, लोकसंख्या नियंत्रणाची गरज आहे. वर्षाला १० लाख नोकऱ्या दिल्या जात, असून आतापर्यंत ३६ कोटी लोकांना नोकऱ्या किंवा रोजगार दिला गेला," असाही दावा आठवले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.