Pune Loksabha Election : मोहोळांचा प्रचाराचा धडाका तर नाराज मुळीकांनी घेतली फडणवीसांची भेट

Jagdish Mulik Meet Devendra Fadnavis : जगदीश मुळीक आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक योगेश मुळीक यांनी मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Jagdish Mulik - Devendra Fadnavis
Jagdish Mulik - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News:  भाजपच्या दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या यादीत पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर झाले. उमेदवारी जाहीर होताच मोहाळांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले माजी आमदार जगदीश मुळीक यांनी गुरुवारी (ता. 21) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत मुळीक यांची नाराजी दूर होऊन ते आता प्रचारात सक्रिय होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Jagdish Mulik - Devendra Fadnavis
Ajit Pawar Vs Vijay Shivtare: पुरंदरचे 'बापू' बारामतीत अपक्ष म्हणून उभे राहिले, तर शिवसेनेचे राज्यभरातील उमेदवार अडचणीत येणार

भाजपतर्फे (bjp) पुण्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. मुळीक यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी, स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी गेले वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडेही फिल्डिंग लावलेली होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी वैयक्तिक गाठीभेटी घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. मोहोळ यांनी मुळीक यांच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यावेळी मुळीक कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. पण वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला जगदीश मुळीक अनुपस्थित राहिल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. त्याची दखल वरिष्ठ पातळीवरूनही घेण्यात आली. जगदीश मुळीक आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक योगेश मुळीक यांनी आज मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री फडणवीस यांची आज वैयक्तिक कारणासाठी भेट घेतली. पण या वेळी लोकसभेच्या संदर्भाने कोणतीही चर्चा झालेली नाही. मी माझ्या कामानिमित्ताने वडगाव शेरीच्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण पुढील दोन महिने पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सहयोगी पक्षांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका होत आहेत. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. बैठकीतून पक्षांतर्गत हेवे-दावे आणि रुसवे-फुगवे मिटवण्यावर भर देण्यात येत आहे. पुण्यात आज महायुतीची बैठक झाली. बैठकीला भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) अनुपस्थित होते. यामुळे मुळीक हे पक्षावर नाराज आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Jagdish Mulik - Devendra Fadnavis
Pune News: मोहोळांवर मुळीक नाराज? स्वत:च्या मतदारसंघातील बैठकीकडे फिरवली पाठ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com