Walmik karad : 'कोठडीत 24 तास मदतनीस हवा...'; नवीन बेडचा वाद सुरू असतानाच वाल्मिक कराडची मोठी मागणी

Walmik Karad's Demand : विरोधकांनी वाल्मिक कराड ज्या पोलिस कोठडीत आहे. त्याच पोलिस स्टेशनमध्ये 5 नवीन बेड का मागवले? असा प्रश्न उपस्थित केली आहे. अशातच आता वाल्मिक कराडने आपल्याला तुरूंगात एक मदतनीस मिळावा अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी त्याने एक याचिका केली देखील केली आहे.
Walmik karad
Walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Beed News, 03 Jan : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने सीआयडी कोठडी सुनावली आहे. मात्र, तो पोलिसांना शरण येण्याच्या आधीपासून कराडला पोलिस मदत करत असल्याचा आरोप काही नेत्यांकडून केला जात होता.

दरम्यान, काल विरोधकांनी कराड ज्या पोलिस कोठडीत आहे. त्याच पोलिस स्टेशनमध्ये पाच नवीन बेड का मागवले? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर शंका उपस्थित केली आहे. अशातच आता वाल्मिक कराडने (Walmik karad) आपल्याला तुरूंगात एक मदतनीस मिळावा अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

यासाठी त्याने एक याचिका केली असून त्यामध्ये त्याने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा करत एक मदतनीस मिळावा अशी मागणी केली आहे. कराडने केलेल्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्यभरात वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी केली जात होती.

तर वाल्मिक कराडच या हत्येचा मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप देखील विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून केला जात होता. त्यानंतर माझ्यावर खंडणीच्या गुन्हात गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मी सरेंडर होत असल्याचं सांगत वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात पोलिसांना (Pune Police) शरण आला. त्यानंतर न्यायालयाने त्याला 15 दिवसाच्या सीआयडी कोठडीत सुनावली.

Walmik karad
Sanjay Raut : 'आम्ही त्यांचे अभिनंदन करतो...'; ठाकरेंच्या 'सामना'तून CM फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव

याच CID कोठडीत असलेल्या कराडने आता त्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा करत कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी केली आहे. तर या आजारात आजारात पेशंटला ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. हीच मशीन चालवण्यासाठी कराडने सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस पाहिजे अशी मागणी त्याने केली आहे.

Walmik karad
Devendra Fadnavis : CM फडणवीसांच्या शासकीय दौऱ्यात इथून पुढे पोलिस मानवंदना देण्याची प्रथा बंद!

त्याने केलेल्या मागणी अर्जानंतर केज जिल्हा व सत्र न्यायालयाने सीआयडीला शासकीय वैद्यकीय सुविधा पुरविण्यास सांगितल्याची माहिती आहे. मात्र, वाल्मिक कराडला आता एक मदतनीस दिल्यास त्याचे राजकीय पडसाद देखील पाहायला मिळू शकतात. कारण कराडला कोठडीत व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप सध्या अनेक नेत्यांसह संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. अशातच आता त्याने केलेल्या या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com