Pankaja Munde Dasara Melava : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे कोणावर साधणार निशाणा ?

Dussehra Melava at Bhagwangad : दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांचे जन्मगाव सावरगाव घाट येथील भगवान गडावरील दसरा मेळाव्याला उपस्थितीची साद घातली आहे. यंदाचा मेळावा त्यांच्यासाठी अनेक अर्थाने महत्वाचा आहे. सध्या त्यांची सुरु असलेली राजकीय घुसमट, कारखान्यावरील जीएसटीची कारवाई यामुळे या मेळाव्यातून पंकजा मुंडे आपल्या तोफगोळ्यांतून कोणावर मारा करणार, याकडे बीड जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष लागले आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या केंद्रस्थानी असत. त्यांच्या अपघाती निधनानंतर भगवान गडावरील सभेचे व्यासपीठ पाडून टाकण्यात आले. पुढे पंकजा मुंडे व गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांच्यातही दुरावा निर्माण झाला. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली. त्यांनी या ठिकाणाला भगवान भक्तीगड नामकरण करुन बाबांचे भव्य स्मारकही उभारले. कोविडचा काळ सोडला तर या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी जमा झालेली दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde
Kolhapur Politics : आधी लगीन 'बिद्री'चं, त्यानंतरच विधानसभा ; ए. वाय. पाटलांचं 'गणित' ठरलं!

यंदाचा दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मेळाव्याच्या मैदानाची सफाई देखील सुरु झाली आहे. मात्र, यंदाचा मेळावा पंकजा मुंडे यांच्या दृष्टीने अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. त्यात त्यांची भविष्यातील राजकीय वाटचाल काय असेल, याबाबत मेळाव्यात त्या काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१० महिन्यांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डाच असल्याचे निक्षून सांगितले होते.आपल्या राजकीय भवितव्याबाबत आपण अमित शहांना भेटण्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, शहांनी अद्यापही त्यांना भेट दिली नाही. पण या उलट शहांच्या केंद्रीय सहकार मंत्रालयामार्फत राज्यातील आजारी कारखान्यांना मदत झाली. परंतु, यातून पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ कारखानाच यातून वगळण्यात आला.

Pankaja Munde
Beed News: मुख्याधिकारी डॉ. गुट्टेंना मोठा दिलासा; फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची भावना

विशेष म्हणजे जीएसटी विभागाने कारखान्याकडील थकीत जीएसटी प्रकरणी जप्तीची कार्यवाही देखील सुरु केली आहे. याबाबत पंकजा मुंडे यांनी माध्यमांकडे आपली भूमिका मांडली असली तरी मेळाव्याला जमणाऱ्या राज्यभरातील हजारो समर्थकांसमोर त्या आपली भूमिका स्पष्ट करतील, अशी समर्थकांची अपेक्षा आहे. पंकजा मुंडे यांना मागील चार वर्षांपासून राज्याच्या भाजपकडून सातत्याने डावलले जात आहे. त्यांनी केंद्रीय नेत्यांकडे विचारणा करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्याकडूनच भेट नसल्याने आता पंकजा मुंडेंची भूमिका काय, असेल हेही या मेळाव्यातून स्पष्ट होईल असे मानले जाते.

राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर त्यांच्या परळीच्या विधानसभा उमेदवारीबाबतही प्रश्नचिन्ह आहे. सुरुवातीला श्रेष्ठी काय निर्णय घेतील ते बघू असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता आपण परळीचा दावा सोडणार नसल्याचे संकेत दिले आहेत. या मेळाव्यात याबाबतही त्यांच्याकडून स्पष्ट भूमिका घेतली जाईल, असेही मानले जाते. भाजपकडून त्यांना केवळ डावललेच जात नाही तर त्यांना विधान परिषदेसाठी फॉर्म भरायला लाऊन पुन्हा ऐनवेळी टाळणे हे अपमान करण्यासारखे असल्याने समर्थक भाजपवर संपत्त आहेत.

जीएसटी कारवाईवरुन देखील भाजपवरील संताप समोर आलेलाच आहे. या सर्व बाबींवर ‘लोकांमध्ये असे पर्सेप्शन’ झाल्याचे पंकजा मुंडे म्हणत असल्या तरी आता त्यांनाही आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या सहप्रभारी असलेल्या पंकजा मुंडे राजकीय मैदान तापलेले असतानाही मध्यप्रदेशच्या आखाड्यापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांना भाजप टाळतेय हे अधोरेखित आहे. आता त्यावर त्यांच्याकडून या मेळाव्यात भूमिका मांडली जावी, अशी समर्थकांची अपेक्षा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Pankaja Munde
Reshimbag Nagpur News : शताब्दी महोत्सवासाठी संघ आतापासूनच ‘दक्ष’; गाव तिथे शाखेवर देतोय लक्ष !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.