MGNREGA Wage Hike : केंद्र सरकारचा मनरेगा कामगारांना झटका; वेतनवाढ संदर्भात घेतला मोठा निर्णय

MGNREGA Wage Hike 2026 : मनरेगा कामगारांसाठी केंद्र सरकारने नवीन VB-G RAM G योजना लागू केली आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
Government decision on MNREGA wages 2026
Government decision on MNREGA wages 2026Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. VB GRAMG Act 2025 लागू न झाल्यामुळे मनरेगा कामगारांची वेतनवाढ सध्या थांबलेली आहे.

  2. सुमारे 7 कोटींहून अधिक ग्रामीण कामगारांना याचा थेट फटका बसणार आहे.

  3. नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत जुने वेतन दरच कायम राहणार आहेत.

Navi Mumbai News : केंद्र सरकारने G RAM G म्हणजेच मनरेगा कामगारांना मोठा झटका दिला आहे. कामगारांना वेतनवाढीसाठी केंद्र सरकारकडून ‘विकसित भारत-गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ (VB-G RAM G) कायदा, 2025 लागू केला आहे. पण अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

यामुळे सुमारे सात कोटींहून अधिक कामगारांना वेतनवाढ मिळणार नाही. यामुळे कोट्यावधी कामगारांना वेतनवाढीसाठी नवीन कायदा लागू होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती The Indian Express ने दिलेल्या वृत्तातून मिळत आहे.

हा नवीन कायदा यूपीए काळातील रोजगार हमी योजनेच्या जागी लागू केला जाणार आहे. दरम्यान गेल्या दशकभरात असे पहिल्यांदांच घडले असून सरकारने फेब्रुवारी-मार्च महिन्यात मनरेगा वेतनवाढीची अधिसूचना जाहीर करत असते. पण यावेळी तसे झालेले नाही.

The Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, मनरेगा अंमलबजावणी आणि नवीन VB-G RAM G योजनेबाबत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने (MoRD) सर्व राज्यांना याची माहिती दिली आहे. या माहिती प्रमाणे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नरेगा वेतन दर नवीन योजना लागू झाल्यानंतरच जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मागील आर्थिक वर्षाचे दरच लागू राहतील.

केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (MGNREGA), 2005 च्या कलम 6 उपकलम (1) अंतर्गत नरेगा वेतन दर जाहीर करते. तर नवीन वेतन दर आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून (१ एप्रिल) लागू होतात. साधारणपणे, केंद्र सरकार नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मनरेगा वेतन दर जाहीर करते; मात्र यावर्षी पंधरा दिवस उलटल्यानंतरही ते जाहीर करण्यात आलेले नाहीत. गेल्या १३ वर्षांमध्ये केंद्राने मनरेगाच्या वेतन दराची घोषणा फेब्रुवारी किंवा मार्चमध्येच केली होती.

Government decision on MNREGA wages 2026
MGNREGA Scheme : PM मोदी नाव बदलायला निघालेल्या 'मनरेगा'ची काय आहेत वैशिष्ट्ये

दरम्यान मनरेगा डॅशबोर्डवरील उपलब्ध माहितीनुसार, 14 एप्रिल 2026 पर्यंत या ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तब्बल 11.03 कोटी सक्रिय कामगार नोंदणीकृत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात 5.34 कोटी कुटुंबांनी (7.2 कोटी व्यक्तींनी) नरेगाचा लाभ घेतला आहे. यामुळे तब्बल 7.2 कोटी व्यक्तींनी सध्या वेतनवाढ मिळणार नाही, अशीच माहिती मिळत आहे.

नवी योजना VB-G RAM G काय आहे?

केंद्र सरकार विकसित भारत-रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण) (VB-G RAM G) ही नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. ही योजना सध्याच्या मनरेगा योजनेची जागा घेणार आहे. जोपर्यंत ही योजना लागू होत नाही, तोपर्यंत जुन्या वेतनदरांवरच काम चालू राहणार आहे.

काय परिणाम होणार?

सरकारच्या म्हणण्यानुसार नवीन योजना लागू होत नाही तोपर्यंत जुन्या वेतनदरांवरच काम चालू राहणार आहे. यामुळे कामगारांना काम मिळत राहील. पण त्यांचे कोणतेही हक्क कमी केले जाणार नाहीत. तर या नव्या धोरणामुळे कामगारांच्या रोजगारावर तात्काळ परिणाम होणार नाही.

विरोधकांचा आक्षेप?

दरम्यान या माहितीनंतर आता विरोधकांचा आक्षेप घेत टीका केली आहे. विरोधकांनी यावेळी नवीन VB-G RAM G योजनेतील काही मुद्द्यांवर देखील आक्षेप घेतला आहे. विरोधकांनी, या नव्या धोरणांसह निधी वाटपातील बदलामुळे राज्यांवर जास्त आर्थिक भार पडेल असे सांगत याचा थेट परिणाम शेतीच्या हंगामावर होईल असा इशारा दिला आहे. तर नवीन योजनेत केंद्र आणि राज्य यांच्यातील खर्चाचे प्रमाण बदलतील असेही म्हटले आहे. नवीन योजनेत काही राज्यांसाठी हे प्रमाण 90:10 तर काही राज्यांत 60:40 होईल असेही म्हटले आहे.

Government decision on MNREGA wages 2026
MGNREGA Scam News : ग्रामविकास यंत्रणेत खळबळ उडवून देणारा घोटाळा; रोजगार सेवकांसह अधिकाऱ्यांवर कोसळणार कुऱ्हाड?

FAQs :

1. मनरेगा वेतनवाढ का थांबली आहे?
VB GRAMG Act 2025 लागू न झाल्यामुळे केंद्राने नवीन वेतनदर जाहीर केलेले नाहीत.

2. किती कामगार प्रभावित झाले आहेत?
सुमारे 7 कोटींहून अधिक ग्रामीण कामगार प्रभावित झाले आहेत.

3. नवीन वेतन कधी लागू होणार?
नवीन कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतरच वेतनवाढ लागू होईल.

4. सध्या कोणते वेतन लागू आहे?
मागील आर्थिक वर्षातील वेतनदरच सध्या लागू आहेत.

5. VB GRAMG Act म्हणजे काय?
हा नवीन ग्रामीण रोजगार आणि आजीविका मिशन कायदा असून तो मनरेगा योजनेच्या जागी लागू होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com