BJP MLA Video : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत भाजप आमदार रस्त्यावर भिकारी बनून फिरला! व्हिडिओ व्हायरल; नेमकं कारण काय?

Parag Shah Beggar Video Viral : तब्बल तीन हजार कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या भाजप आमदार पराग शाह यांचा मुंबईतील रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेषात फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Mla Parag Shah Beggar Video Vira
Mla Parag Shah Beggar Video Virasarkarnama
Published on
Updated on

Parag Shah News : महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात श्रीमंत आमदार पराग शाह हे आहेत. मुंबईतील पूर्व घाटपोर मतदारसंघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. आमदार शाह हे घाटकोपरमधील रस्त्यांवर भिकारी बनून फिरत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. मात्र, या व्हिडिओतील सत्य वेगळेच असल्याचे नंतर समोर आले.

पराग शाह यांची संपत्ती तीन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. ते काही तास घाटकोपरच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेष धारण करून फिरले. काही लोकांनी त्यांना मदत केली, खाण्यास दिले.तर, काही जणांनी त्यांना हाकलून लावले. मात्र, असे भिकारी होऊन फिरण्यामागचे कारण म्हणजे पराग शाह यांना त्यांच्या गुरुंनी दिलेला आदेश.

शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी शाह यांना एक दिवस भिकारी बनण्याचा अनुभव घ्यावा, असे सूचवले. त्यानंतर गुरुच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिस संरक्षण, सुरक्षाव्यवस्था, महागड्या गाड्या बाजुला ठेवत ते घाटपोरच्या रस्त्यांवर भिकाऱ्याच्या वेष धारण करून फिरले.

Mla Parag Shah Beggar Video Vira
Councillors corruption : मलिदा वाटून खायचा! भाजपची सत्ता असलेल्या नगरपालिकेतील नगरसेवकांनी घेतली शपथ, व्हिडिओ व्हायरल...

पुन्हा त्या ठिकाणी गेले...

भिकाऱ्याच्या वेषात त्यांनी रस्त्याच्या कडेला बसून खाल्ले, मदत मागितली. काही ठिकाणी चांगला अनुभव आला तर काही ठिकाणी त्यांना हुसकावून लावण्यात आले. दरम्यान, भिकाऱ्याच्या मेकअप काढून ते पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि तेथील लोकांशी चर्चा देखील केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Mla Parag Shah Beggar Video Vira
BJP AI Video : शुध्दलेखनातील चूक अन् थेट मुख्यमंत्र्यांच्या थोबाडीत..! विरोधकांना घेरण्याच्या नादात भाजपने 'लाईन क्रॉस' केली अन् ओढविली नामुष्की

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com