Sanjay Raut News : मनसेचा 'आढावा' भाजपच्या मदतीसाठी..; संजय राऊतांची टीका.

MNS Meeting to help BJP : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेची बैठक.
Raj Thackeray, Sanjay Raut.
Raj Thackeray, Sanjay Raut.Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. त्यावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. मनसेची आढावा बैठक हि भाजपच्या मदतीसाठीच असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. तर फक्त हुकूमशाही विरोधात शिव्या देतात, मात्र प्रत्यक्ष भूमिका घेत नाहीत, असा टोलाही राऊत यांनी मनसेसह इतर आघाड्यांना लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आज मनसेने लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या निमित्ताने बैठक आयोजित केली आहे. यात भाजपला मदत होण गरजेच आहे, याच दृष्टीने काम केले जाणार आहे. तसेच देशासह राज्यात मनसे (MNS), एमआयएम, अन्य पक्ष तसेच इतर आघाड्या आहेत.

Raj Thackeray, Sanjay Raut.
Sudhakar Badgujar News : 'ते' माझ्या जिव्हारी लागलं..! ; '...तर मी आत्महत्याच करेन'.

त्याही याच पद्धतीने भाजपच्या मदतीसाठी काम करत आहेत. त्यांचा गेल्या दहा वर्षातील एक राष्ट्रीय कार्यक्रमाच आहे. एकीकडे भाजप सरकार हुकुमशाही करत असल्याचे बोलायचे. त्यासाठी केंद्र सरकारला शिव्या घालायच्या आणि निवडणुकांची वेळ आली किंवा लढण्याची वेळ आली कि वेगळी भूमिका घ्यायची, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप (BJP) आज जे उभं आहे आणि त्यांच सरकार आहे, ते तोडा व फोडा या पद्धतीचे आहे. त्यांनी फक्त देशासह राज्यात विरोधात तयार होणाऱ्या फोडून आपली सत्ता मिळवली आहे. याबाबत आता तरी निदान महाराष्ट्रातील नेत्यांनी तरी शहानपणाने वागावे. अशी आमची भूमिका असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

(Edited by Amol Sutar)

Raj Thackeray, Sanjay Raut.
Assembly Winter Session : संत्र्याच्या मुद्द्यावर सत्तार हतबल; म्हणाले ‘काय करावं बाबा काही कळतंच नाही’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com