Tukaram Mundhe : MPSC पेपरफुटीच्या चौकशी आयोगाचा विद्यार्थ्यांना धक्का : तुकाराम मुंढेंकडून यादी जाहीर; राज्यसेवा परीक्षा वगळली

MPSC paper leak inquiry commission : MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे यांच्या चौकशी आयोगाने परीक्षांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राज्यसेवा परीक्षेचा समावेश नसल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.
Tukaram Mundhe appointed MPSC secretary
Tukaram Mundhe appointed MPSC secretarySarkarnama
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाच्या कामकाजाला अखेर गती मिळाली आहे. आयोगाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी नऊ परीक्षांच्या चौकशीसाठी पुरावे सादर करण्याचे परिपत्रक नुकतेच जारी केले. मात्र, या नऊ परीक्षांच्या यादीत 'राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५' चा समावेश केलेला नाही.

विशेष म्हणजे, या परीक्षेच्या निकालातील गुणांच्या मूल्यमापनाबाबत विद्यार्थ्यांनी यापूर्वीच गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे इतर परीक्षांची चौकशी होत असताना 'राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५'ला चौकशीच्या कक्षेबाहेर का ठेवले, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Tukaram Mundhe appointed MPSC secretary
IAS Officer Turned Chief Minister : राजीव गांधींच्या एका शब्दावर IASची नोकरी सोडली; मुख्यमंत्री बनले अन् शेवटी काँग्रेसचाच सर्वात मोठा बंडखोर!

'एमपीएससी'च्या परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका फुटल्याची प्रकरणे, तसेच आयोगावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांचा चौकशी आयोग स्थापन केला आहे. या आयोगाला ६० दिवसांत अहवाल सादर करण्याची मुदत दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी जाहीर सूचना प्रसिद्ध केली. यामध्ये चौकशीसाठी नऊ परीक्षांची यादी जाहीर केली असून, या परीक्षांशी संबंधित व्यक्तींना १६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रासह निवेदने, उपलब्ध पुरावे सादर करता येतील. मात्र, या प्रक्रियेत 'राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५'चा उल्लेख केलेला नाही.

या परीक्षांची होणार चौकशी

औषध निरीक्षक परीक्षा, गट-ब, २०२५,

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५,

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, २०२५,

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२५,

Tukaram Mundhe appointed MPSC secretary
Vikram Kale : सतीश चव्हाणांच्या पराभवानंतर शिक्षक आमदार विक्रम काळे सावध; रखडलेल्या प्रश्नांसाठी पाठपुराव्यावर जोर!

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, २०२५,

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा, २०२४,

अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा, २०२३,

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५,

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, २०२५

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.