Mumbai Airport : 'हृदयाचा ठोका चुकला...' मोठी दुर्घटना टळली, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले

Mumbai airport Planes casualties : नवी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले असल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.
Indigo Air India wing collision Mumbai airport
Indigo Air India wing collision Mumbai airportsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले.

  • लँडिंगदरम्यान घडलेल्या या घटनेवेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

  • डीजीसीएने घटनेची चौकशी सुरू करून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Mumbai airport Planes casualties News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती जवळ विमान अपघातात निधन झाले. या घटनेला अद्याप आठवडाही होत नाही तोच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणाच्या आधी बिघाड झाला. उड्डाणाअगोदरच तांत्रिक कारणाने ते उडू शकले नाही. यामुळे हवाई प्रवास अन् त्याची सुरक्षिततेवर प्रश्चचिन्हं उपस्थित होऊ लागले आहेत. याचदरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले असल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री लँडिंगच्या वेळी घडल्याचे समोर आले असून दोन्ही विमानं प्रवाशांनी भरलेली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणाऱ्या मुंबई विमानतळावर ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनेत दोन विमानांची एकमेकांना टक्कर झाल्याची माहिती आहे. अर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची ही धडक झाली असून दोन्ही विमानांच्या पंखांची टोक एकमेकांना घासली.

सुदैवाने दोन्ही विमानांचा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप असून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहेत. तर या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचं किरकोळ नुकसान झाले असून ती दुरुस्तीसाठी रवाना झाली आहेत. या घटनेनंतर या प्रकरणाची चौकशी केली जात असून डीजीसीएनेदेखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Indigo Air India wing collision Mumbai airport
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरणार

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या धावपट्टीवर जवळील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन विमानांच्या पंखांचे (विंगटिप्स) परस्परांमध्ये धडकले. विमान धावपट्टीवरून पुशबॅक करत असताना लँडिंगनंतर टॅक्सी करणारे इंडिगो विमान त्याच्या जवळ आले आणि दोन्ही विमानांचे पंख एकमेकांवर आदळले.

मुंबईहून कोयंबतूरसाठी जाणारे एअर इंडियाचे विमान (एआय २७३२) उड्डाणाची तयारी करत टॅक्सीवेवर थांबले होते. त्याचवेळी हैदराबादहून मुंबईला पोहोचलेले इंडिगोच्या विमानाने (६ई ७९१) लँडिंग केले होते. याचवेळी दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांमध्ये घासले. ज्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या विंगटिपला नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर विमान प्रशासनाला याची माहिती देण्यात आली तर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ DGCA मुंबई कार्यालयातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आणि अधिक चौकशी केली जात आहे.

यावेळी इंडिगोने सांगितले की, हैदराबादहून मुंबईसाठी चाललेल्या आमच्या ६ई ७९१ विमानाचे एक विंगटिप लँडिंगनंतर दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाला घासले. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना उतरण्यात आले आहे. या प्रकाराबद्दलही अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले असून, याची चौकशी सुरू आहे. आमच्यासाठी ग्राहक, क्रू आणि विमानांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

याचवेळी एअर इंडियाच्या प्रवक्त्याने, मंगळवारी 273 विमान मुंबईहून कोइंबतूर आणि सेवा रस्ताना दुसऱ्या विमानाने च्या संपर्कात आले. यात विमानाच्या पंखाच्या दोन टोकांना किरकोळ नुकसान झाले आहे. याच प्रकरणामुळे विमानाला विलंब झाला. खबरदारीच्या उपाययोजनेअंतर्गत, विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी थांबवण्यात आले असून तपासणी केली जात आहे. आमचे सर्व प्रवासी सुरक्षित उतरवण्यात आले असून लवकर त्यांना गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. अर इंडियाला या घटनामुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल खेद असून आमची सर्वोच्च प्राथमिकता ही आमच्या प्रवासी आणि क्रूची सुरक्षितता असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Indigo Air India wing collision Mumbai airport
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाला संघाशी संबंधित नेत्याचे नाव देण्याचा डाव, रोहित पवारांचा गंभीर आरोप

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली.

2. कोणत्या विमान कंपन्यांची विमाने involved होती?
इंडिगो आणि एअर इंडियाची विमाने involved होती.

3. घटनेवेळी विमानात प्रवासी होते का?
होय, दोन्ही विमानांमध्ये प्रवासी होते.

4. ही घटना कधी घडली?
विमान लँडिंगच्या वेळी ही घटना घडली.

5. या प्रकरणी चौकशी कोण करत आहे?
डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून विमान कंपन्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com