

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीमध्ये यावेळी तिकीट न मिळाल्यानं सर्वच पक्षांमध्ये नाराजांची मोठी संख्या दिसून येत आहे. तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वात जास्त इनकमिंग सध्या भाजपमध्ये सुरू आहे. दरम्यान आता भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये काँग्रेसमधून मोठा पक्षप्रवेश होणार आहे.
राज्यभरात भाजपकडून ऑपरेशन लोटस' राबविले जात आहे. हे ऑपरेशन लोटस आता अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी राबवले जात आहे. काँग्रेसने भाजपसाओबत हातमिळवणी केल्याने बुधवारी दुपारी तडकाफडकी 12 नगरसेवक निलंबित केले होते. आता निलंबित करण्यात आलेले हे 12 नगरसेवक आता भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते.
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मोठे प्लॅनींग केले होते. शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत भाजप आणि काँग्रेस अंबरनाथ नगरपरिषदेत एकत्र आले होते. भाजपचे 16, काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 अशा एकूण 32 नगरसेवकांनी एकत्र येत शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. भाजपने काँग्रेसला सोबत घेऊन अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अंबरनाथ नगरपालिकेतील 12 नगरसेवकांना थेट काँग्रेसमधून निलंबित केले होते.
त्यामुळे काँग्रेस (Congress) नगरसेवकांची अवस्था बिकट झाली होती. त्यातच आता अंबरनाथ काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी हा पक्षप्रवेश होत आहे. दरम्यान यावेळी बोलताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्याकडून ब्लॉक अध्यक्ष पदासाठी एक कोटीची मागणी केली, असा आरोप प्रदीप पाटील यांनी केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना या युती संदर्भात आम्ही सांगितले होते, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आम्ही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाकडून आमच्यावर करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत चुकीची व अन्यकारक आहे, काँग्रेसने निवडणुकीमध्ये एकदाही आम्हाला विचारले नाही, अथवा प्रचार देखील केलेला नाही. आम्ही आमच्या जोरावर निवडून आलो, असेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामधील नाराज मंडळी इकडून तिकडे प्रवेश करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.