Nagpur MLC Election : नागपूरमध्ये काँग्रेसचा अभूतवूर्व गोंधळ; राऊत-केदार वादामुळे चौघांना उमेदवारी; AB फॉर्मचा सस्पेन्स कायम

Political news : माजी मंत्री नितीन राऊत व सुनील केदार यांच्या वादामुळे काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यात अडचणी येत आहेत. यावर तोडगा म्हणून काँग्रेसकडून चार जण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुसरीकडे मात्र, नागपूरची जागा काँग्रेसला सुटली असताना अद्याप उमेदवार जाहीर करता आलेला नाही. माजी मंत्री नितीन राऊत व सुनील केदार यांच्या वादामुळे काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यात अडचणी येत आहेत. यावर तोडगा म्हणून काँग्रेसकडून चार जण उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.

नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार ठरवताना कॉंग्रेसला (Congress) तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून उमेदवारी ठरविताना माजी मंत्री नितीन राऊत व सुनील केदार यांच्यातील वादामुळे कोणत्याच नावावर एकमत होत नाही. त्यामुळे आता काँग्रेसकडून चार जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करून इतर तीन जण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे समजते.

Congress
MLC Election : सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी 'राष्ट्रवादी'चा पुन्हा ZP पॅटर्न? संख्याबळाने वाढवली भाजपची धडधड

नागपूर मतदार संघातून काँग्रेसकडून अतुल लोंढे, सुरेश जाग्याशी, दिनेश ढोले, सुनीता महल्ले हे चौघे जण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर या पैकी एकाची उमेदवारी फायनल करून बाकी तीन उमेदवार मागे घेणार असल्याचे समजते. दुसरीकडे काँगेसच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Congress
Congress News : काँग्रेसने मोठा डाव टाकला, विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला! धाराशिव-बीड-लातूरमधून नव्या चेहऱ्याला संधी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही तास शिल्लक असतानाच नागपूरमध्ये काँग्रेसचा अभूतवूर्व गोंधळ दिलेत आहे. या ठिकाणी माजी मंत्री नितीन राऊत-सुनील केदार (Sunil Kedar) यांच्यातील वादामुळे चौघांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे चौघे जण उमेदवारी अर्ज दाखल करणार असले तरी AB फॉर्म बाबतचा सस्पेन्स कायम आहे.

Congress
MLC election : ऐनवेळी उमेदवाराची माघार,125 मते फोडली! धाराशिव-बीड-लातूरमध्ये पुन्हा 'घोडेबाजार' की मोठा उलटफेर? काँग्रेसमुळे सस्पेन्स वाढला?

नागपूर विधान परिषदेसाठी एकूण ७९४ मते आहेत. त्यामध्ये भाजप ५०१, शिवसेना ३०, राष्ट्रवादी ५ असे महायुतीचे ५३६ मतदार आहेत त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी व अपक्ष व इतर मिळून २४८ मतदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Congress
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com