Nana Patekar : 'शेतकरी संकटात, नाना कधीच मागे राहिले नसते पण...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

Nana Patekar Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते
Nana Patekar death Devendra Fadnavis tribute
Nana Patekar death Devendra Fadnavis tributesarkarnama
Published on: 
Updated on: 

Nana Patekar News : ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते, अशी भावूक श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांना अर्पण केली.

आज नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मिडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.

'परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.', असे देखील त्यांनी सांगितले.

Nana Patekar death Devendra Fadnavis tribute
Nana Patekar Passes Away : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; गोव्यात घेतला अखेरचा श्वास

मदतीत ते मागे राहिले नसते...

'शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Nana Patekar death Devendra Fadnavis tribute
BJP vs Shiv Sena : भाजप-शिवसेना वाद विकोपाला! महापौरांच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com