Nashik IT Company Case: IT धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATSकडे; कंपनीनं नाशिकमधील काम थांबवलं

ATS Investigation Nashik IT Company: नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे आणि एका युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न असे प्रकार उघड झाले आहेत.
ATS Investigation Nashik IT Company:
ATS Investigation Nashik IT Company:Sarkarnama
Published on
Updated on

Nashik IT Company News: नाशिक येथील IT कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता दहशतवाद तपास पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला आहे. एटीएसचे एक अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांचे पथक शहरात दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय तपास यंत्रणांनी घेतली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये घडणाऱ्या प्रकारांचाही तपास केला जाणार आहे. नाशिक पोलिसांकडून माहिती घेत तक्रारदारांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. आरोपींची चौकशी एटीएसकडून करण्यात येणार असून सीडीआर अहवाल तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे

या आयटी कंपनीत सुरू असलेल्या लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या काळ्या कारभारावर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या 'स्पेशल ऑपरेशन'मध्ये एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे.

ATS Investigation Nashik IT Company:
PMC News: ​पुण्यात गल्लीबोळातील 'नावाच्या' राजकारणाला चाप! प्रशासनाने शोधला 'जालीम' उपाय

अशातच आता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ​आता राज्याच्या पोलिसांनंतर केंद्रीय तपास यंत्रणा एटीएस आता मैदानात उतरली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य रॅकेट असण्याचा संशय बळावला असून, त्यामुळेच आता केंद्रीय यंत्रणांच्या तपास यंत्रणा संबंधित आरोपींचा कसून तपास करणार आहे.

ATS Investigation Nashik IT Company:
Bhondubaba In Mumbai: बकऱ्याचा कलेजा, स्मशान राख अन् दारूची बाटली; आणखी एका भोंदूबाबाचा प्रताप! आजार दूर करण्याचा दावा

आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण 8 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आहे. यात एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत 9 FIR (गुन्हे) दाखल झाले आहेत. लैंगिक शोषण, जबरदस्ती/प्रलोभनातून धर्मांतर,ब्लॅकमेलिंग असे गंभीर आरोप यात करण्यात आले आहेत. आरोपींचे कॉल रेकॉर्ड, WhatsApp ग्रुप, तपासले जात आहेत.

या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभिर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. २०२२ ते २०२६ या कालावधीत हे गुन्हे घडले असल्याची माहिती आहे. यातील एक गुन्हा लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक शोषणाचा तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मातराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

ATS Investigation Nashik IT Company:
Rahul Gandhi News: 'स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी सावरकरांनाच का? राहुल गांधींच्या वकिलांचा न्यायालयात थेट सवाल!

या कंपनीच्या एचआर निदा खान अद्याप फरार आहे. तिचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, आता ज्या नाशिकमधील आयटी कंपनीत अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला होता. त्या कंपनीनं आपलं कामकाज थांबवलं आहे. कर्मचाऱ्यांना कंपनीत उपस्थित न राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.बुधवारी नाशिकच्या कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्याने कंपनीतील 150 कर्मचाऱ्यांना तूर्त सोमवारपासून Work From Home करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली टीमकडून झाडाझडती सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com