MLC Elections 2026 : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप फिक्स? भाजपला सर्वाधिक जागा, तर शिंदेसेना अन् राष्ट्रवादीच्या वाट्याला किती?

Mahayuti Seat Sharing MLC Elections 2026 : विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बुधवारी (ता. २०) समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. बैठकीला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
Maharashtra MLC Elections 2026 | Mahayuti Seat Sharing
Senior Mahayuti leaders hold discussions over Maharashtra Legislative Council election seat sharing ahead of the June 18 voting.Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLC Elections 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून विधान परिषद निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. अशातच विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक १२ जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता आहे.

येत्या आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या फॉर्म्युल्यात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra MLC Elections 2026 | Mahayuti Seat Sharing
Ramgiri Maharaj on sand mining : गोदावरीतील वाळूचा एक कणही उचलू देणार नाही! महिलांचा एल्गार, रामगिरी महाराजही मैदानात

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीसंदर्भात बुधवारी (ता. २०) समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. बैठकीला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

Maharashtra MLC Elections 2026 | Mahayuti Seat Sharing
Latur NEET scam : "जिथे स्कॅम तिथे काँग्रेस; मोटेगावकर त्यांचाच कार्यकर्ता, प्रत्येक निवडणुकीत...", भाजप आमदाराचा गंभीर आरोप

कोणत्या जागेवर कुणाचा दावा?

भाजप - नागपूर, वर्धा - चंद्रपूर - गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर - जालना, सातारा - सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा - गोंदिया, अमरावती, लातूर - धाराशीव - बीड, सोलापूर.

शिवसेना - ठाणे, नाशिक, यवतमाळ.

राष्ट्रवादी काँग्रेस - रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, हिंगोली-परभणी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com