Nashik Politics : एकाच दिवशी ३ पक्षातील ३ बड्या नेत्यांवर गंभीर गुन्हे, नाशिकच्या राजकारणात खळबळ

Nashik Crime News : नाशिक शहराच्या राजकारणात सक्रीय असलेले ३ वेगवेगळ्या पक्षातील ३ मोठ्या नेत्यांवर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात एकाच दिवशी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
Shivaji Chumbhale,Ashok Murtadak
Shivaji Chumbhale,Ashok MurtadakSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime Politics : एकाच दिवसात वेगवेगळ्या पक्षाच्या तीन बड्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शहराच्या राजकारणात सक्रीय असलेल्या तीन दिग्गज नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एक माजी महापौर, विद्यमान गटनेते आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापतींचा समावेश आहे.

माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यावर गुन्हा दाखल

माजी महापौर व सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले अशोक मुर्तडक यांच्या कथित छळाला कंटाळून पंचवटीतील एका सराफ व्यावसायिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. उसनवारीवर घेतलेले पैसे मोठ्या प्रमाणावर परत करूनही उर्वरित पैशांसाठी सातत्याने तगादा, धमक्या आणि घरात घुसून कुटुंबीयांसमोर अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. या प्रकरणी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बाळकृष्ण दाभाडे (रा. तारवालानगर, पंचवटी) यांनी वर्षभरापूर्वी मुर्तडक यांच्याकडून सुमारे ९० लाख रुपये उसनवार घेतले होते. त्यातील काही रक्कम त्यांनी परतही केली होती. मात्र, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी मुर्तडक यांच्याकडून सातत्याने तगादा लावला जात असल्याची तक्रार आहे. यादरम्यान दाभाडे यांना धमकावणे, घरात घुसून कुटुंबीयांसमोर अपमानास्पद वर्तन करणे असे प्रकार वारंवार घडत होते.

Shivaji Chumbhale,Ashok Murtadak
Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! शिंदेंच्या नेत्यावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, कार्यालयाबाहेरच कोयत्याने सपासप वार केले अन्...

दाभाडे हे वैद्यकीय कारणास्तव हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असतानाही संशयितांनी तेथे जाऊन पैशांसाठी दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तसेच पुन्हा घरी येऊन शिवीगाळ व धमक्या दिल्यानंतर दाभाडे प्रचंड मानसिक तणावाखाली गेले. या त्रासाला कंटाळून त्यांनी बाथरूममध्ये जाऊन फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

शिवाजी चंभुळेंसह सात जणांवर गुन्हा

दुसऱ्या घटनेत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व भाजप नेते शिवाजी चुंभळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनगर परिसरात शेतजमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर चाकूने जीवघेणा हल्ला व पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी सुरेश रंगा बोराडे (५५, रा. पिंपळगाव खांब, ता. जि. नाशिक) यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चुंबळे व त्यांच्या ६ ते ७ साथीदारांविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivaji Chumbhale,Ashok Murtadak
Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये दर्शनाचा काळाबाजार उघड, शरद पवारांच्या पक्षातील बड्या नेत्याला अटक

केशव पोरजेंविरोधात माजी सैनिकाची तक्रार

तिसऱ्या घटनेत, शिवसेना ठाकरे गटाचे महापालिका गटनेते केशव पोरजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. एका माजी सैनिकाला हक्काच्या घरासाठी प्लॉट देण्याचे आमिष दाखवून 9 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केशव पोरजे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी सैनिक अनिलकुमार शिवराम बारी यांनी पोरजे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केशव पोरजे यांच्यासह त्यांचा शालक विशाल मालुंजकर आणि गणेश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com