नवाब मलिकांनी असा लावला 'देवेंद्र फडणवीस आणि अंडरवर्ल्ड'चा संबंध....

मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांचा हायड्रोजन बाँम्ब टाकला आहे.
Devendra Fadanvis and Nawab Malik
Devendra Fadanvis and Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात बनावट नोटा भारतात चालण्यासाठी तत्कालिन सरकारचे अभय होते, असा आरोप करत मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हायड्रोजन बाँम्ब टाकला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि अंडरवर्ल्डशी कसे संबंध होते याचा सविस्तर उलगडाच त्यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि समीर वानखेडेंचे जुने संबंध आहेत. सोबतच फडणवीस इतरांवर आरोप करतात की तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे, पण फडणवीसांना विचारु इच्छितो की जे गुन्हेगार लोक आहेत त्यांना सरकारी महामंडळांचे अध्यक्ष का बनवले? नागपूरचा गुंड मुन्ना यादव याला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे अध्यक्ष का बनवले? हैदर आजम याला मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष का बनवले? असा सवाल केला आहे.

Devendra Fadanvis and Nawab Malik
हायड्रोजन बाँम्ब : मुख्यमंत्री काळात फडणवीसांचा खोट्या नोटांच्या रॅकेटना आशीर्वाद

नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांच्याशी संबंधित असल्याचे आरोप करत फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध जोडला आहे. रियाज भाटी कोण होता, ज्याला दोन पासपोर्टसह पकडला होता. तो भाजपच्या कार्यक्रमात कसा असायचा? पंतप्रधान मुंबईत आले तेव्हा रियाज भाटी याने त्यांच्याबरोबर फोटो काढला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात सगळी चौकशी करून प्रवेश दिला जातो, पण इथे रियाज भाटीला प्रवेश कसा दिला जातो? असे सवाल मलिकांनी फडणवीसांना केले आहेत.

Devendra Fadanvis and Nawab Malik
मलिकांचे मानसिक संतुलन बिघडतय, बहुदा हर्बल तंबाखू कमी पडत असावी...

रियाज भाटी अंडरवर्ल्डचा माणूस, दाऊदशी संबंधीत माणूस होता. तो सध्या फरार आहे, त्याला फडणवीसांनी आपल्या जवळ का ठेवले होते. फडणवीस यांनी सगळ्या क्रिमिनल लोकांना पदावर बसवले, खोट्या नोटांचे रॅकेट चालवणार्‍यांना पदे दिली. तसेच खोट्या नोटांच्या प्रकरणाचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे, तेव्हा ते डीआरआयला होते. खोट्या नोटांची कारवाई केली तेव्हा वानखडे यांच्या मदतीने फडणवीसांनी हे प्रकरण दाबले होते, असाही आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com