मलिकांचे मानसिक संतुलन बिघडतय, बहुदा हर्बल तंबाखू कमी पडत असावी...

बनावट नोटांचा सगळा खेळ फडणवीसांच्याच आशीर्वादाने चालायचा.
Devendra Fadnavis, Ashish Selar &Nawab Malik
Devendra Fadnavis, Ashish Selar &Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नोटबंदीनंतर जवळपास वर्षभर महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नव्हते. त्याचे कारण बनावट नोटांचा हा सगळा खेळ फडणवीसांच्याच आशीर्वादाने चालायचा. तसेच बनावट नोटांशी संबंधित प्रकरणे फडणवीसांनी समीर वानखेडेंच्या मदतीने दाबली असे अनेक आरोप करत महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हायड्रोजन बाँम्ब फोडला आहे.

मात्र या आरोपांवार नवाब मलिकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, बहूदा हर्बल तंबाखू त्यांना कमी पडतीय असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले, हायड्रोजन बाँम्बची भाषा करणारे सकाळी १० वाजता लवंगी फटका पण लावू शकले नाहीत. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाज भाटी, समीर वानखेडे अशी नाव आणून त्यांनी खूप मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला पण तो विफल ठरला.

Devendra Fadnavis, Ashish Selar &Nawab Malik
हायड्रोजन बाँम्ब : मुख्यमंत्री काळात फडणवीसांचा खोट्या नोटांच्या रॅकेटना आशीर्वाद

अकबर-बिरबलच्या खिचडीचे उदाहरण देत शेलार म्हणाले की, पुन्हा एकदा सिद्ध झाले तीन पक्ष, सगळी यंत्रणा लावून देखील ते फडणवीसांना चिकटणारा सोडा त्यांना लागू शकेल असा आरोप ते खोदून काढू शकले नाहीत. मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा हे पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांना विविध महामंडळांचे अध्यक्षपद देवू केले होते हे शेलार यांनी मान्य केले, पण मुन्ना यादव यांच्यावरील १ गुन्हा सोडल्यास इतर दोघांवर एकही गुन्हा नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. मुन्ना यादव हे यांच्यावर १ आरोप आहे, पण याचे स्पष्टीकरण तेच देतील, असेही शेलार म्हणाले.

Devendra Fadnavis, Ashish Selar &Nawab Malik
"फडणवीसांनी गुन्हेगारांना सरकारी महामंडळांच्या अध्यक्षपदी बसवले

राष्ट्रवादीला आव्हान देतान शेलार म्हणाले, २ वर्ष तुमचे सरकार आहे, तुमच्या पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे, पण या दोन वर्षात तुम्ही त्यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करु शकला नाही. त्यामुळे गुन्हेगारांना राजाश्रय देण्याचा धंदा तुमचा आहे. यात देवेंद्र फडणवीसांच्या काळात कुठेही गैरकारभार झालेला नाही. उलट बनावट नोटांमध्ये पकडला गेलेला हाजी अराफतचा भाऊ इम्रान आलम शेख हा काँग्रेसचा तत्कालिन सचिव होता. पण आता तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तसेच पंतप्रधान किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी रियाज भाटीचा काहीही संबंध नसल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Ashish Selar &Nawab Malik
मलिकांनी सांगितलं, `समीर वानखेडे आणि देवेंद्र फडणवीस यांच असंही कनेक्शन!`

नवाब मलिक यांच्या बद्दल आता मला काळजी वाटत आहे, दिवसागणिक त्यांचे मानसिक संतुलन बिघडतय की काय ही आशंका आमच्या मनात आहे. बहूदा हर्बल तंबाखूचा सप्लाय आता त्यांना बंद पडला असावा. असा टोला शेलार यांनी मलिकांना लगावला. पण त्यांनी आता स्वतःला शांत करावे, आणि जावयाच्या प्रेमापोटी राजकारणाच्या नीच पातळीवर उतरु नये असा सल्लाही त्यांनी मलिकांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com