NCP Candidate : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचा उमेदवार जाहीर, 'या' नेत्यावर सुनेत्रा पवारांचा विश्वास

MLC Election NCP Zeeshan Siddique Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत संपण्याच्या काही तास आधीच आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. काल (बुधवार) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराच्या नावाबाबत उत्सुकता होती. अखेर विधान परिषदेची उमेदवारी झिशान सिद्दीकी यांना जाहीर केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी झिशान सिद्दीकी आणि त्यांचे वडील बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बाबा सिद्धीकी यांची बिश्नोई गँगकडून हत्या करण्यात आली होती. तर,विधानसभा निवडणुकीत झिशान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवानंतर झिशान यांचे राजकीय कारकिर्द धोक्यात आली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी झिशान यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याबाबत मोठी स्पर्धा होती. तब्बल 80 नेत्यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. मात्र, पाच नावे ही अंतिम करण्यात आली होती. मीडिया रिपोर्टनुसार पार्थ पवार यांनी देखील विक्रम काकडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मांत्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत झिशान यांच्या नावावर एकमत झाले.

Sunetra Pawar
BJP MLC Election: मोठी बातमी: भाजपचं विधान परिषदेसाठी धक्कातंत्र,अंदाज चुकवला; उमेदवारांची यादी अखेर जाहीर, कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट?

मुंबईत पक्षाला ताकद

महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत चांगली कामगिरी करता आली नाही. झिशान सिद्दीकी हे माजी आमदार आहेत. बाॅलिवूडमध्ये देखील त्यांचे कनेक्शन आहे. उच्चभ्रू वर्गात सिद्दीकी यांच्या नावाला पसंती आहे. या सर्व बाजुंचा विचार करत मुंंबईत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सिद्दीकी यांना उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा आहे.

Sunetra Pawar
Shivsena MLC Election: अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच अंधारेंची भूमिका समोर; ठाकरेंसोबतचा 'मार्मिक' व्हिडीओ शेअर; 'कॅप्शन'मधून दिला मोठा संदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com