NCP News : निर्मला नवलेंना राज्याच्या राजकारणात मोठी संधी : ग्रामपंचायतीतील पराभवानंतर थेट संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी

Sunetra Pawar organisational changes News : युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे, तर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली.
sunetra pawar, nirmla nawle
sunetra pawar, nirmla nawleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाप्रमाणेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन दिवसापासून संघटनात्मक बदल केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती जाहीर केली. त्यासोबतच याचवेळी युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे, तर विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर गुरुवारी युवती आघाडीच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी युवतीचे प्रदेशाध्यक्षापद बीड जिल्ह्यातील संध्या सोनवणे यांच्याकडे होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात निर्मला नवले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावचे सरपंचपद निर्मला नवले यांनी भूषवले आहे. स्थानिक पातळीवर, विशेषतः ग्रामीण भागात त्यांनी तरुण आणि महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे.

उच्च शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या निर्मला शुभम नवले यांनी वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला होता. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेल्या निर्मला नवले यांनी 2021 मध्ये कारेगावच्या सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या कारेगावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला आहे.

sunetra pawar, nirmla nawle
NCP News : रुपाली चाकणकरांची पहिली रिप्लेसमेंट वैशाली नागवडे... महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आता 4 नावांची चर्चा

यापूर्वी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील युवतींशी थेट संवाद साधून संघटन मजबूत केले. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण राज्यातील युवतींचे सक्षम संघटन उभारणे आणि नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्याची मुख्य जबाबदारी आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com