

Nitin Karale News : नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात लढत असलेल्या नितीन कराळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांना महाविकास आघाडीचा पाठींबा असताना नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून ते निवडणूक लढत होते.
दरम्यान, पक्षविरोधी कारवाई केल्याने तसेच शरद पवारांचा आपल्याला पाठींबा असल्याचा संभ्रम निर्माण केल्याचा ठपका ठेवत पक्षाने कराळे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना कराळे मास्तर ओक्साबोक्शी रडले.
ते म्हणाले, मला या कारवाईची माहिती सोशल माध्यमातूनच समजली आहे. मी लोकसभेला मोदींच्या विरोधात प्रचार केला. पक्षाचे सर्व खासदार निवडणूक यावेत म्हणून प्रयत्न केले. तब्बल 110 सभा मी घेतल्या. दिवसाला आठ आठ सभा घेतल्या. आता मी अपक्ष उभा असल्याने लोकांचा मला चांगला प्रतिसाद आहे. सहा जिल्ह्यातून लोकांचा मोठा प्रतिसाद आहे.लोक स्वतःहून कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने दबाव टाकून काही कारवाई करायला भाग पाडले.
पुढे बोलताना ते म्हणाले, पवारसाहेबांचा मी सन्मान करतो. त्यांच्याकडून पाहून मी अनेक गोष्टी शिकलो. मला तरी वाटते की माझ्यावर केलेली कारवाई चुकीची आहे. मतदानातून लोक याला उत्तर देतील.
कराळे यांनी नंतर एक व्हिडिओ करत सांगितले की, ते रडणारे नाही तर लढणारे आहेत. पण कधी स्वतः सोबत घडलेल्या घटनांमुळे माणूस भावनिक होतो. शेवटी मन प्रत्येकालाच असते. आता आपण मतदानातून आपली ताकद दाखवून देऊ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.