Old Monk FSSAI action : ओल्ड मॉन्क पुन्हा बाजारात येणार? कारवाईबाबत हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Old Monk FSSAI controversy explained : ओल्ड मॉन्कच्या काही व्हेरिएंटवर FSSAI ने कारवाई केली आहे. ही कारवाई का झाली, कोणते प्रकार प्रभावित आहेत आणि हायकोर्टातील प्रकरण काय आहे, जाणून घ्या.
Old Monk FSSAI action : ओल्ड मॉन्क पुन्हा बाजारात येणार? कारवाईबाबत हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
Published on
Updated on

ओल्ड मॉन्क आणि मॅकडॉवेल्स रमवरील कारवाईवरून भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI च्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (10 ऑगस्ट) प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाचा संबंध थेट उत्पादनाच्या गुणवत्ता किंवा सुरक्षिततेशी नसून लेबलिंगच्या पद्धतीशी असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

FSSAI ने उत्पादक युनिट्सच्या तपासणीनंतर घेतलेल्या कारवाईला युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मोहन मिकिन लिमिटेड या मद्य उत्पादक कंपन्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली.

Old Monk FSSAI action : ओल्ड मॉन्क पुन्हा बाजारात येणार? कारवाईबाबत हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
PAN कार्डसाठी Agent ला पैसे देताय? फोनवरूनच मोफत मिळवा Instant e-PAN! वापरा 'ही' सोपी ट्रिक

युनायटेड स्पिरिट्सच्या वतीने ज्येष्ठ वकील वीरेंद्र सराफ यांनी कंपनीची बाजू मांडताना कारवाईपूर्वी कंपनीला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी देण्यात आली नसल्याचा दावा केला. तसेच उत्पादनामुळे कोणतीही हानी झाल्याची तक्रारही आलेली नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मोहन मिकिनच्या वतीने ज्येष्ठ वकील नवरोज सिरवई यांनीही कंपनीचे उत्पादन नियमांनुसार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, "आमचे उत्पादन 100 टक्के नियमांनुसार होते."

दरम्यान, FSSAI ने नवीन उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली असली, तरी बाजारात आधीपासून उपलब्ध असलेल्या साठ्याला ‘रम फ्लेवर्ड स्पिरिट’ असे नवीन लेबल लावून विक्री करण्यास परवानगी दिल्याचे समोर आले. मात्र, मद्याच्या लेबलला राज्य उत्पादन शुल्क विभागाची मंजुरी आवश्यक असल्याने लेबलमध्ये तातडीने बदल करणे शक्य नसल्याचे कंपन्यांनी न्यायालयाला सांगितले.

दुसरीकडे, योग्य लेबलिंग सुनिश्चित करणे ही FSSAI ची प्रमुख चिंता असल्याचे सांगण्यात आले. संबंधित उत्पादनांमध्ये अनधिकृत कृत्रिम किंवा ‘निसर्गाशी मिळतेजुळते’ फ्लेवरिंग पदार्थ असल्याचा दावा करण्यात आला. अशा पद्धतीच्या लेबलिंगमुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे FSSAI ने न्यायालयात स्पष्ट केले.

Old Monk FSSAI action : ओल्ड मॉन्क पुन्हा बाजारात येणार? कारवाईबाबत हायकोर्टाने प्रशासनाला फटकारले, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
IAS दीप्ती गौड मुखर्जींकडे देशाच्या उच्च शिक्षणाची कमान; जाणून घ्या त्यांचा प्रशासकीय प्रवास!

या प्रकरणी केंद्र सरकारला 19 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे ओल्ड मॉन्कवरील FSSAI कारवाई, रम लेबलिंगचा वाद आणि ग्राहकांच्या दिशाभुलीचा मुद्दा याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com