Election Commission criticism: विरोधकांचे मोर्चाद्वारे 'महाशक्तिप्रदर्शन'; निवडणूक आयोगाला थेट 'टार्गेट' करताना काय म्हणाले नेते !

Opposition march News: यावेळी निवडणूक आयोगाला थेट 'टार्गेट' करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चौफेर टीका केली.
maharashtra election commission
maharashtra election commissionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यातच राज्यातील विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात एकवटले आहेत. त्यातूनच आता विरोधकांने 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाद्वारे महाशक्तिप्रदर्शन करण्याचे ठरवले आहे. यावेळी निवडणूक आयोगाला थेट 'टार्गेट' करताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चौफेर टीका केली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सकाळीच मेळाव्यातुन निवडणूक आयोगाला निवडणूका घेण्याचे चॅलेंज दिल्यानंतर आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यातील निवडणूक यादीत मोठ्या संख्येने बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप प्रमुख विरोधी पक्षांनी केला आहे. त्यासाठी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shivsena), शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या नेत्याची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत या सर्व पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आणत जोरदार टीका केली.

maharashtra election commission
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो' व्हिडिओ; नरेंद्र मोदी, शिंदे, पवारांचे आमदार काय बोलले ते लाईव्ह दाखवले

निवडणूक आयोग हा भाजपचा गुलाम: संजय राऊत

यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निवडणूक आयोग हा भाजपचा गुलाम असल्याची टीका करीत एक नोव्हेंबरला शनिवारी निवडणूक आयोगाच्या या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या गावा गावातून जिल्ह्या-जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत, आणि मतदारांची जी ताकद आहे, ती देशांच्या पंतप्रधानांना आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल, असा इशारा दिला.

maharashtra election commission
Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा 'लाव रे तो' व्हिडिओ; नरेंद्र मोदी, शिंदे, पवारांचे आमदार काय बोलले ते लाईव्ह दाखवले

सत्ताधारी पक्षाने मोर्चात सहभागी व्हावे : जयंत पाटील

विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चात काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चात इच्छा असेल तर राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले.

maharashtra election commission
Laxman Hake letter : 'जरांगे हे फक्त मुखवटा; मागे क्रूर मराठा राजकीय नेते...', सीएम फडणवीसांना लक्ष्मण हाकेंचे पत्र

निवडणूक आयोगाच्या डोळयात अंजन घालण्यासाठी मोर्चा : बाळा नांदगावकर

मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार घुसवण्यात आले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदार याद्या तपासण्याच्या सूचना केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या डोळयात अंजन घालण्यासाठी मुंबईत १ नोव्हेंबरला सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

maharashtra election commission
BJP Election Strategy : ZP साठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; उमेदवार निवडीसाठीची प्रोसेस तयार

लोकशाही नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न : सचिन सावंत

विरोधी पक्षाच्या मतांना राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने फार काही किंमत दिलेली दिसत नाही असे म्हणत त्यांनी केंद्रीय नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी मतदारांच्या घोटाळ्याबाबत दिलेल्या माहितीचा पुनरुच्चार केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास 41लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी याआधीच सांगितलेले आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रात सहा लाख 55 हजार मतदार वाढले, असा दावा सचिन सावंत यांनी केला.

maharashtra election commission
NCP News : पंडीत, क्षीरसागर की आणखी कोणी ? बीड राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा पेच; फाटाफुटीमुळे नेते विखुरले!

मतदार यादी पारदर्शक करा : प्रकाश रेड्डी

विधानसभा निवडणूक घोळ असलेल्या मतदार यादीच्या मदतीने झाली. आता नव्या मतदार यादीतही मोठा घोळ झालेला आहे. लोकशाही प्रक्रियेत आदर्श निवडणूक प्रक्रिया राबवली जात नाही. त्यामुळे येत्या काळात ही मतदार यादी पारदर्शक करा, असा इशारा भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिला.

maharashtra election commission
Congress Protest : महायुती सरकारचा धिक्कार करणार ; कॉंग्रेस नेते खाणार शेतकऱ्यांसोबत 'पिठलं भाकरी' अन् ठेचा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com